Join us

विन डिझेल लवकरच येणार भारतात ; दीपिका करतेय सरप्राईज प्लॅनिंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2017 18:47 IST

दीपिका पादुकोण ही ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ झांडर केज’ चित्रपटात हॉलिवूड अभिनेता विन डिझेल सोबत दिसणार आहे. ...

दीपिका पादुकोण ही ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ झांडर केज’ चित्रपटात हॉलिवूड अभिनेता विन डिझेल सोबत दिसणार आहे. चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. पण, दीपिकाकडे तिच्या चाहत्यांसाठी एक धमाकेदार सरप्राईज आहे. ठाऊक आहे का काय आहे हे सरप्राईज? होय, तिने हे नुकतेच तिच्या ट्विटर अकाऊंटवरून ‘विन डिझेल हा १२ व १३ तारखेला मुंबईत असणार आहे. आम्ही सर्व भारतीय तुझे येथे स्वागत करतो. आम्ही तुझी आतुरतेने वाट पाहत आहोत,’ असे तिने शेअर केले आहे. }}}}बरं, आता तुम्ही विचार करत असाल की, दीपिका देणार आहे ते सरप्राईज नेमकं आहे तरी काय? याविषयी सांगताना ती म्हणते, ‘आम्ही विनला एअरपोर्टवर घ्यायला जाणार आहोत. मी भारताकडून यजमान म्हणून त्याचे स्वागत करणार. त्यानंतर त्याच्या राहण्याची, जेवणाची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच एक मोठी पार्टी  त्याच्यासाठी माझ्याकडून आयोजित केली आहे. या पार्टीत बॉलिवूडचे निवडक तारे-तारका असतील. कुलाबा आणि मध्य मुंबई येथील टॉपच्या हॉटेलमध्ये त्याच्या निवासाची सोय करण्यात आली आहे. अर्थात तो मुंबईत चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येणार आहे.’दिग्दर्शक डी.जे.करूसो यांचा ‘ट्रिपल एक्स: द रिटर्न आॅफ झांडर केज’ भारतीय चित्रपटगृहात १४ जानेवारीला रिलीज होणार आहे. दीपिकाचा हा हॉलिवूड डेब्यू चित्रपट असून, ती यात सेरेना उंगरची भूमिका साकारत आहे. डोनी येन, निना डोबे्रव्ह, रूबी रोज आणि सॅम्युअल एल.जॅक्सन हे कलाकार तिच्यासोबत या चित्रपटात दिसतील. दीपिकाचा हा चित्रपट डेब्यू असल्याने ती तिच्या चित्रपटाकडून असलेल्या अपेक्षा सांगताना म्हणते,‘मी चित्रपटाच्या बाबतीत खूपच उत्सुक आहे. हा माझा पहिला हॉलिवूड डेब्यू आहे. हॉलिवूडच्या माझ्या प्रवासाला आता सुरूवात झाली आहे. मला अभिमान वाटतो की, या चित्रपटाच्या माध्यमातून मी देशाचे प्रतिनिधित्व करते आहे.’