दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा बहुचर्चित 'रामायण' सिनेमा यावर्षी दिवाळीत रिलीज होणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार असून साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत आहे. सिनेमात इतरही मोठी स्टारकास्ट आहे. यश रावण तर सनी देओल हनुमानाची भूमिका साकारणार आहे. काही साउथ कलाकारही सिनेमात दिसणार आहेत. दरम्यान एका सुपरहिट दाक्षिणात्य सुपरस्टारची सिनेमात एन्ट्री झाली आहे. कोण आहे ?
मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेता विजय सेतुपती 'रामायण'मध्ये दिसणार आहे. या पौराणिक महाकाव्यात तो रावणाचा भाऊ 'बिभीषण'ही अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. त्याच्या एन्ट्रीमुळे हिंदी आणि दाक्षिणात्य अशा दोन्ही प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. विजय सेतुपती आपल्या कसदार अभिनयासाठी ओळखला जातो आणि बिभीषणाची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी एका गंभीर आणि अनुभवी अभिनेत्याची गरज होती. नितेश तिवारी यांनी सेतुपतीची या भूमिकेसाठी निवड करण्यामागे त्याचे 'स्क्रीन प्रेझेंस' आणि संवादफेकीवरील पकड ही मुख्य कारणे असल्याचे म्हटले आहे. बिभीषणाचे पात्र हे नीतिमत्ता आणि अधर्माविरुद्धचा लढा दर्शवते, त्यामुळे सेतुपति या भूमिकेला पूर्ण न्याय देईल, असा विश्वास निर्मात्यांना वाटत आहे.
सुरुवातीला बिभीषणाच्या भूमिकेसाठी जयदीप अहलावतला कास्ट करण्याचा मेकर्सचा विचार होता. मात्र जयदीप अहलावत आणि यशच्या तारखा न जुळल्याने जयदीपच्या हातातून सिनेमा गेला. कारण बिभीषणाचे जास्त सीन्स हे रावणासोबतच असणार होते. तसंच या भूमिकेसाठी नितेश तिवारी संयमी, धीरगंभीर अभिनेत्याच्या शोधात होते. विजय सेतुपतीच्या रुपाने त्यांचा शोध संपला असल्याचं दिसत आहे.
या चित्रपटात रावणाच्या भूमिकेत 'केजीएफ' फेम यश दिसणार असल्याने, सेतुपति आणि यश या दोन दिग्गज कलाकारांना पडद्यावर एकत्र पाहणे ही प्रेक्षकांसाठी मोठी मेजवानी ठरेल. 'रामायण' हा चित्रपट केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावर प्रदर्शित करण्याची निर्मात्यांची योजना आहे.या चित्रपटाचे चित्रीकरण अत्यंत भव्य स्वरूपात सुरू असून, व्हीएफएक्स (VFX) आणि सेट डिझाइनवर मोठा खर्च केला जात आहे. सिनेमाचं एकूण बजेट ४००० हजार कोटींपर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे. सिनेमा २ पार्ट्समध्ये रिलीज होणार आहे. पहिला पार्ट यावर्षी तर दुसरा पार्ट पुढील वर्षी येणार आहे.
Web Summary : Nitesh Tiwari's 'Ramayana' features Ranbir Kapoor as Rama, Sai Pallavi as Sita, and Yash as Ravana. Vijay Sethupathi is now confirmed as Vibhishana, generating excitement among fans. The film, with a budget around ₹4000 crore, will release in two parts, starting this Diwali.
Web Summary : नितेश तिवारी की 'रामायण' में रणबीर कपूर राम, साई पल्लवी सीता और यश रावण की भूमिका में हैं। विजय सेतुपति अब विभीषण के रूप में निश्चित हो गए हैं, जिससे प्रशंसकों में उत्साह है। लगभग ₹4000 करोड़ के बजट वाली यह फिल्म इस दिवाली से दो भागों में रिलीज होगी।