Join us

View Pics : आरवची ‘बर्थ डे’ पार्टी एन्जॉय करताना दिसली मम्मी ट्विंकल अन् बहीण नितारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 22:27 IST

सध्या बॉलिवूडमध्ये स्टार किड्सचा बोलबाला आहे. दर दिवसाला एक तरी स्टार किड्स चर्चेत असतो. विशेष म्हणजे आता हे स्टार ...

सध्या बॉलिवूडमध्ये स्टार किड्सचा बोलबाला आहे. दर दिवसाला एक तरी स्टार किड्स चर्चेत असतो. विशेष म्हणजे आता हे स्टार किड्स मीडिया अटेंशन एन्जॉय करू लागल्याने चांगलेच चर्चेत राहत आहेत. कॅमेरा दिसताच वेगवेगळ्या पोझ देत ही मंडळी स्वत:चे वलय दाखवून देत आहेत. मात्र बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार याचा मुलगा आरव मात्र यापासून काहीसा दूर आहे. कारण मीडियाचे कॅमेरे दिसताच तो नर्व्हस होतो. वास्तविक हे आम्ही या अगोदरदेखील सांगितले आहे. यावेळेस पुन्हा नव्याने सांगण्याचे कारण म्हणजे आरव १५ वर्षांचा झाला आहे. परंतु अशातही तो कॅमेºयाचा सामना न करताना चेहरा लपवित पळ काढतो. आरवने कालच त्याचा पंधरावा वाढदिवस साजरा केला. त्याच्या मम्मी-पप्पाने त्याला अतिशय खास अंदाजात विषही केले. आज ट्विंकल खन्ना आपल्या मुलांसोबत लंच करताना जात असताना स्पॉट झाली. कदाचित आरवची बर्थ डे पार्टी म्हणून ट्विंकल मुलांसोबत लंचकरिता गेली असावी. आरवनेही मम्मी आणि आपल्या बहिणीसोबत ही पार्टी एन्जॉय केली. कारण पार्टीत आरव खूपच आनंदी दिसत होता. मात्र जसा तो रेस्टॉरंटच्या बाहेर पडला तसा त्याच्या चेहºयावरील आनंद कमी झाला. कारण मीडियाचे कॅमेरे बघताच त्याने चेहरा लपविला. खरं तर आरव आता पंधरा वर्षांचा झाला आहे. त्यामुळे त्याने मीडियाचा सामना करण्याची सवय पाडायला हवी. वास्तविक आरव जरी मीडियाचे कॅमेरे बघून दूर जात असला तरी, त्याची बहीण नितारा मात्र मीडियासमोर कम्फर्टेबल असल्याचे दिसून आली. कॅमेºयाचे फ्लॅश बघून ती त्यास एन्जॉय करताना दिसली.