बायोपिकमध्ये सावित्रीच्या भूमिकेत विद्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2016 19:19 IST
विद्या बालन ही वास्तव व चित्रपट जीवनातील फरक मिटविणारी अभिनेत्री आहे. पडद्यावर भूमिका कशी साकारायची हे कौशल्य तिला चांगलेच ...
बायोपिकमध्ये सावित्रीच्या भूमिकेत विद्या
विद्या बालन ही वास्तव व चित्रपट जीवनातील फरक मिटविणारी अभिनेत्री आहे. पडद्यावर भूमिका कशी साकारायची हे कौशल्य तिला चांगलेच अवगत झाले आहे. त्यामुळे बायोपिक चित्रपटासाठी तिच्यापेक्षा अधिक चॉईस कुणाला नसल्याचे दिसून येते. सूत्रांच्या माहिती नुसार विद्या ही साऊथ चित्रपटामध्ये एक बायोपिक करणार असून, त्योच दिग्दर्शन नाग आश्विन करीत आहेत. तेलगू सुपर स्टार सावित्रीच्या जीवनावर आधारित ही बायोपिक आहे. तसे विद्याने याअगोदर ‘द डर्टी’ मध्ये साऊथची सिल्क स्मिता वर आधारित भूमिका केलेली आहे. त्या बायोपिकचे मिलन लूथरियाने दिग्दर्शन केले होते. त्याचबरोबर मराठी चित्रपटातील ‘एक अलबेला’ मध्ये विद्या बालनने बालीची भूमिका साकारली होती. ‘भगवान दादा’वर आधारित ती बायोपिक होती. साऊथ चित्रपटात ५० व ६० च्या दशकातील सावित्री ही लोकप्रिय अभिनेत्री होती. तेलगूमध्ये तिच्या जीवनावर आधारित असलेल्या बायोपिकचे नाव ‘महानती’ असे आहे. यामध्ये विद्या कशी दिसते, याची प्रतिक्षा आहे.