Join us
Daily Top 2Weekly Top 5

विद्या बालनच्या 'शेरनी'मधील 'मैं शेरनी...' गाणं झालं रिलीज, जगभरातील महिलांना केला सलाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 15:47 IST

विद्या बालनचा शेरनी चित्रपट १८ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बॉलिवूडची उलाला गर्ल म्हणजेच अभिनेत्री विद्या बालनने आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिका साकारून रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा ती एका हटके भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे शेरनी. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी अमेझॉन प्राइम व्हिडीओने 'मैं शेरनी' हे दमदार गाणे प्रदर्शित केले आहे. यात विद्या बालनसह काही अनोख्या व्यक्तिमत्त्वाच्या स्त्रिया आहेत. तगून राहण्याच्या जिद्दीची यशोगाथा मांडणारे हे खास गाणे अकासा आणि रफ्तार यांनी गायले आहे. पारंपरिक समजुतींना मोडीत काढत सर्व आव्हानांविरोधात ठामपणे उभे राहत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या या शेरनींच्या साहसाला या गाण्यातून सलाम करण्यात आला आहे. 

या म्युझिक व्हिडीओमध्ये मिरा एर्डा (F4 रेसर आणि ड्रायव्हर कोच), नताशा नोएल (बॉडी पॉझिटिव्हिटी इन्फ्ल्युएन्सर आणि योगा ट्रेनर), एश्ना कुट्टी (सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर आणि हुला-हूप डान्सर) आणि त्रिनेत्रा हलदार (कर्नाटकातील पहिली ट्रान्सजेंडर डॉक्टर), जयश्री माने (बी.वाय.एल नायर हॉस्पिटलमधील आघाडीची लढवय्यी), रिद्धी आर्या (आघाडीच्या लढवय्यांना जेवण पुरवणारी विद्यार्थिनी), अनिता देवी (सुरक्षा रक्षक), सीमा दुग्गल (शिक्षिका), अर्चना जाधव (घरकाम) यांच्यासोबत विद्या बालन दिसणार आहे. राघव यांनी लिहिलेले 'मैं शेरनी' या गाण्याला उत्कर्ष धोतेकर यांनी संगीत दिले आहे. 

याबाबत  अभिनेत्री विद्या बालन म्हणाली, "कधीही हार न मानण्याची अमर्याद जिद्द बाळगणाऱ्या जगभरातील महिलांना आम्ही दिलेली सलामी म्हणजे मैं शेरनी हा म्युझिक व्हिडीओ. शेरनी आम्हा सर्वांसाठी फार खास आहे आणि हा सिनेमा आणि म्युझिक व्हिडीओच्या माध्यमातून आम्ही अशा महिलांना वंदन करतो ज्यांनी दाखवून दिले की महिला करू शकणार नाहीत असं काहीच नसतं. या सिनेमातील माझी व्यक्तिरेखा विद्या विन्सेट... यातून आम्हाला दाखवायचं आहे की स्त्री निर्भय असते, ताकदवान असते. वाघीण असण्यासाठी डरकाळीच फोडायला हवी, असं नाही. अँथम बनलेल्या या गाण्यातून आम्ही हेच दाखवू पाहतोय."

विद्या बालनचा शेरनी चित्रपट १८ जून रोजी अमेझॉन प्राइम व्हिडीओवर रिलीज होणार आहे.

टॅग्स :विद्या बालन