Join us

विद्या बालनची ‘ही’ मुलगी आता अशी दिसते, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2018 20:38 IST

अभिनेत्री विद्या बालन स्टारर ‘कहानी-२’ या चित्रपटात आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणारी बाल कलाकार तुनिषा शर्मा आता मोठी झाली ...

अभिनेत्री विद्या बालन स्टारर ‘कहानी-२’ या चित्रपटात आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणारी बाल कलाकार तुनिषा शर्मा आता मोठी झाली आहे. नुकताच तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अनेकांना हिच का विद्याची मुलगी? असा प्रश्न पडत आहे. चंदीगढमध्ये राहणारी तुनिषा शर्मा हिचा जन्म ४ जानेवारी २००२ मध्ये झाला. ‘कहानी-२’ या चित्रपटादरम्यान तिचे वय केवळ १४ वर्ष इतके होते. असे म्हटले जात आहे की, तुनिषाने आतापर्यंत अभिनयासाठी कुठलाही क्लास लावला नाही. ‘कहानी-२’ व्यतिरिक्त तुनिषाने ‘फितूर’ या चित्रपटामध्येही काम केले आहे. तिच्याबद्दल असेही म्हटले जाते की, तुनिषाचा लूक काहीसा कॅटरिना कैफसारखा आहे. तिने महाराणा प्रताप आणि शेर-ए-पंजाब यांसारख्या टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. दरम्यान, तुनिषाने ‘कहानी-२’मध्ये मिनी या नावाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात ती आणि विद्या बालन व्यतिरिक्त अभिनेता अर्जुन रामपाल याचीही प्रमुख भूमिका होती. प्रेक्षकांना हा चित्रपट चांगलाच भावला होता. दरम्यान, तुनिषा लवकरच बॉलिवूडपटामध्ये झळकावी अशी तिच्या चाहत्यांची अपेक्षा आहे. तुनिषाचा अभिनयातील आतापर्यंतचा प्रवास पाहता आगामी काळात ती मोठ्या बॅनरच्या चित्रपटांमध्ये झळकण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तिची वाटचाल सुरू असून, चाहत्यांना लवकरच ती पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर बघावयास मिळणार आहे, यात शंका नाही.