Join us
Daily Top 2Weekly Top 5

विद्या बालनची बहीण आहे प्रसिद्ध अभिनेत्री, बोल्ड सीन्स देण्यात तिचाही आहे हातखंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 12:43 IST

प्रियामणीने बाहुबलीचे दिग्दर्शक राजामौलीबरोबरही काम केले आहे. विशेष म्हणजे विद्या बालनपेक्षाही प्रियामणी दिसायला सुंदर आहे. सिनेमात बोल्ड सीन्स देण्यासाठी ती प्रसिद्ध आहे.

वैविध्यपूर्ण आणि दर्जेदार तितक्याच संवेदनशील भूमिका साकारत रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलेली अभिनेत्री म्हणजे विद्या बालन. विविध सिनेमांतील भूमिकांनी चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान मिळवलं आहे. डर्टी पिक्चर सिनेमा असो किंवा कहानी, पा असो किंवा भुलभुलैय्या अशा कित्येक सिनेमात विद्याने आपल्यातील अभिनय कौशल्य दाखवून दिले आहे. डर्टी पिक्चर या सिनेमात तिने सिल्क स्मितावर आधारित व्यक्तीरेखा साकारली होती. 

फार कमी लोकांना माहिती आहे की, विद्याची चुलत बहीणदेखील दाक्षिणात्य सिनेसृष्टीत ती प्रसिद्ध आहे. प्रियामणी असे विद्याच्या बहिणीचे नाव आहे. विद्याप्रमाणेच प्रियामणीनेदेखील स्वतःच्या मेहनतीवर आज आपले अस्तित्व निर्माण केले आहे.

प्रियामणीने बाहुबलीचे दिग्दर्शक राजामौलीबरोबरही काम केले आहे. विशेष म्हणजे विद्या बालनपेक्षाही प्रियामणी दिसायला सुंदर आहे. सिनेमात बोल्ड सीन्स देण्यासाठी ती प्रसिद्ध आहे. त्यामुळे सर्वात बोल्ड अभिनेत्रींच्या यादीत आज प्रियामणीचेही नाव सामिल झाले आहे. दमदार अभिनयासह आपल्या मादक अदा आणि ग्लॅमरस अंदाजाने तिने रसिकांची मने जिंकली आहेत. तिच्या या अदांवर फिदा होऊन निर्माते आपल्या सिनेमात घेतात.

सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते.  नेटिझन्सना ती अक्षरक्षा वेड लावते.सोशल मीडियावर ती आपले फोटो शेअर करत असते. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्या फलोअर्सची संख्याही अधिक आहे. एक बिनधास्त जीवन जगणारी अभिनेत्री अशी प्रियामणीची ओळख आहे. स्वतःच्या मर्जीनुसार हवं तसं जीवन जगायला तिला आवडतं. जीवनातील कुठलीही खासगी गोष्ट असो किंवा मग एखादी भूमिका, प्रियमाणीला जे आवडते ते ती करते. 

टॅग्स :विद्या बालन