विद्या बालनने म्हटले, ‘विवाहित अभिनेत्री हिट चित्रपट देऊ शकत नाहीत’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 21:26 IST
‘तुम्हारी सुलु’मध्ये दमदार अभिनय करणाºया विद्या बालनने म्हटले की, विवाहित अभिनेत्री हिट चित्रपट देऊ शकत नाहीत, परंतु मी त्यास अपवाद आहे.
विद्या बालनने म्हटले, ‘विवाहित अभिनेत्री हिट चित्रपट देऊ शकत नाहीत’!
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन हिच्या काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या ‘तुम्हारी सुलु’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगला गल्ला जमविला. याच अनुषंगाने एका न्यूज एजन्सीबरोबर बोलताना विद्याने म्हटले की, लग्नानंतर सातत्याने माझे चित्रपट अयशस्वी होऊलागल्याने असे वाटू लागले की, विवाहित अभिनेत्री हिट चित्रपट देऊ शकत नाहीत. परंतु ‘तुम्हारी सुलु’ या चित्रपटाने माझी ही धारणा चुकीची ठरविली.’ विद्याने म्हटले की, चित्रपटाला मिळालेली प्रशंसा आत्मविश्वास वाढविणारी आहे. परंतु एक वेळ अशीही आली होती, ज्यामुळे माझी अशी धारणा झाली होती की, विवाहित अभिनेत्री हिट चित्रपट देऊ शकत नाही. दरम्यान, विद्याच्या ‘तुम्हारी सुलु’ला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे विद्या भलतीच खूश झाली आहे. तिने मुलाखतीदरम्यान सांगितले की, या अगोदर मी जे चित्रपट केले होते ते कदाचित प्रेक्षकांना फारसे भावले नाहीत. मात्र ‘तुम्हारी सुलु’चे यश माझ्यासाठी व्यक्तिगतरीत्या अभिमानास्पद आहे. माझ्यासाठी कलाकार आणि एक विवाहित महिला दोन्ही महत्त्वाचे असल्याचेही विद्या म्हणाली. पुढे बोलताना विद्याने म्हटले की, अपयश हे माझ्यासाठी खूप मोठा धडा होता. कारण जोपर्यंत यश मिळत नाही, तोपर्यंत प्रयत्न करीत राहायला हवे. मी त्यानुसार प्रयत्न केले, अखेर यश मिळाल्याची भावना विद्याने व्यक्त केली. दरम्यान, विद्याने ‘तुम्हारी सुलु’ या चित्रपटात सुलोचनाची भूमिका साकारली. प्रेक्षकांना तिची ही भूमिका चांगलीच पसंतीस आली. अतिशय सामान्य कथा असलेल्या या चित्रपटात विद्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक केले गेले. शिवाय प्रेक्षकांनाही विद्याचा हा हटके अंदाज आवडल्यामुळे चित्रपटाला बॉक्स आॅफिसवर चांगले यश मिळाले. चित्रपटात विद्या एका गृहिणीच्या भूमिकेत होती.