Join us
Daily Top 2Weekly Top 5

​महिला केंद्रित चित्रपटाची निर्मिती आनंददायी - विद्या बालन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2016 22:12 IST

बॉलिवूडमध्ये महिला केंद्रित चित्रपटांची निर्मिती होत आहे, ही आनंददायी गोष्ट असल्याचे मत अभिनेत्री विद्या बालन हिने व्यक्त केले आहे. ...

बॉलिवूडमध्ये महिला केंद्रित चित्रपटांची निर्मिती होत आहे, ही आनंददायी गोष्ट असल्याचे मत अभिनेत्री विद्या बालन हिने व्यक्त केले आहे. विद्याचा आगामी चित्रपट ‘कहानी 2’ व ‘तुम्हारी सलू’ मध्ये विद्याची प्रमुख भूमिका आहे, हे विशेष. पा, कहानी व डर्टी पिक्चर या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारी विद्या बालन बॉलिवूडमधील मोस्ट टॅलेंटेड अभिनेत्रींपैकी एक आहे. निवडक चित्रपटात काम करणारी विद्या आपल्या भूमिकांमुळे चर्चेत असते. ‘कहानी 2’ या चित्रपटाती ती अशा महिलेची भूमिका करीत आहे जी आपल्या मुलीचा शोध घेत आहे. मात्र पोलिसांना अशी शंका आहे की तिनेच आपल्या मुलीची हत्या केली आहे.  तर ‘तुम्हारी सलू’मध्ये ती रेडिओ जॅकीच्या भूमिकेत दिसेल. विद्या म्हणाली, समाजात महिलांची भूमिका बदलत आहे. यामुळे चित्रपटांमध्ये देखील ती प्रतिबिंबिंत होत आहे. महिला कुणाला परिभाषित करीत नाहीत. आम्हा महिलांचे स्वतंत्र जीवन आहे, भावना व स्वप्ने आहेत. आम्हाला आमच्या पद्धतीने जीवन जगायचे आहे. बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री महिलांवर आधारित चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारात आहे. हे पाहणे आमच्यासाठी आनंददायी आहे. लवकरच विद्या तिच्या आगामी तुम्हारी सलू या चित्रपटात रेडिओ जॅकीच्या भूमिकेत दिसणार आहे. यात ती आरजे सुलोचनाची भूमिका साकारणार आहे. विद्या या चित्रपटाबद्दल म्हणाली या चित्रपटात माझी भूमिका लिंबा सारखी आहे. लिंबाची चव सर्वांनाच चाखविशी वाटते. तुम्हारी सलू चे निर्माता भूषण कुमार म्हणाले, ही विद्याला केंद्रस्थानी ठेऊन लिहिण्यात आलेली भूमिका आहे. यात विद्या बालनचे खरे रू प प्रेक्षकांना पहायला मिळेल.