डर्टी पिक्चरची अभिनेत्री विद्या बालनने म्हटले, ‘शरीर नव्हे विचार सेक्सी असावेत’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2018 20:48 IST
काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या ‘तुम्हारी सुलु’ या चित्रपटाच्या यशामुळे अभिनेत्री विद्या बालन भलतीच खूश आहे. या चित्रपटात तिने एका ...
डर्टी पिक्चरची अभिनेत्री विद्या बालनने म्हटले, ‘शरीर नव्हे विचार सेक्सी असावेत’!
काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या ‘तुम्हारी सुलु’ या चित्रपटाच्या यशामुळे अभिनेत्री विद्या बालन भलतीच खूश आहे. या चित्रपटात तिने एका रेडिओ जॉकीची भूमिका साकारली होती. रात्रीचा एक शो करताना ती लोकांच्या मनाचा ठाव घेताना त्यांच्या मनातील सुप्त इच्छा जाणून घेत असताना या चित्रपटात बघावयास मिळाली. असो, विद्याने या चित्रपटानंतर एका वेबसाइटला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने असे काही वक्तव्य केले, जे एकून त्यावर विश्वास ठेवणे जरा अवघड होईल. विद्याने हे वक्तव्य मुंबई मिररच्या वेबसाइटशी बोलताना केले. तिने म्हटले की, ‘डर्टी पिक्चर’ आणि ‘तुम्हारी सुलु’ हे दोन्ही चित्रपट महिलाप्रधान आहेत. ‘डर्टी पिक्चर’मध्ये सिल्क तिच्या शरीराचा आधार घेऊन पैसा कमाविते. तर सुलु आत्मविश्वासाने संसाराचा गाडा चालवू इच्छिते. पुढे बोलताना विद्याने म्हटले की, सुलुने लोकांचा तो विचार बदलून टाकला, जे नेहमीच म्हणायचे की, महिला रात्री उशिरापर्यंत काम करू शकत नाहीत. खरं तर हा सर्व मानसिकतेचा भाग असल्यानेच अशाप्रकारचे मुद्दे उपस्थित होतात. माझ्याकरिता सेक्सी असण्याचा अर्थ सेक्सी दिसणे नसून, सेक्सी होणे आहे. विद्याने म्हटले की, चित्रपटात एक दृश्य दाखविण्यात आले, ज्यामध्ये सुलु तिच्या पतीबरोबर भांडी घासताना सेक्स करण्याविषयी बोलत असते. माझ्या मते, तिचे हे विचार सेक्सी आहेत. काही लोक लूकच्या आधारे लोकांना जज करीत असतात. परंतु माझ्या मला असे वाटते की, लूकपेक्षा विचार सेक्सी असणे गरजेचे आहे. दरम्यान, ‘तुम्हारी सुलु’ या चित्रपटात विद्याने एका मिडल क्लास महिलेची भूमिका साकारली. जिचे नाव ‘सुलु’ असते. या चित्रपटात विद्या व्यतिरिक्त मानव कौल याचीही महत्त्वाची भूमिका होती. हा चित्रपट १७ नोव्हेंबर रोजी रिलीज झाला. बॉक्स आॅफिसवर चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला.