Join us
Daily Top 2Weekly Top 5

​ द्रौपदीच्या वस्त्रहरणात सामील होते विधू विनोद चोपडा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2016 20:21 IST

महाभारतात दुर्योधन आणि शकुनीने  धूर्तपणे द्यूत क्रीडेमध्ये   युधिष्ठिरची संपत्ती जिंकून घेतली. त्यानंतर युधिष्ठिरने द्रौपदीला पणाला (डावावर)लावले आणि दु:शासनाने ...

महाभारतात दुर्योधन आणि शकुनीने  धूर्तपणे द्यूत क्रीडेमध्ये   युधिष्ठिरची संपत्ती जिंकून घेतली. त्यानंतर युधिष्ठिरने द्रौपदीला पणाला (डावावर)लावले आणि दु:शासनाने भर सभेत द्रौपदीचे वस्त्रहरण केले.  द्रौपदीच्या या वस्त्रहरणावेळी विधू विनोद चोपडाही तिथे होते, हे सांगितले तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र हे खरे आहे. द्रौपदीच्या वस्त्रहरणात विधू सामील होते.  आता तुम्ही म्हणाल हे काय अजब..पण हे खरे आहे. होय, विधू यांनी ‘जाने भी दो यारों’ या चित्रपटात अभिनय केला होता. या चित्रपटात ते दुर्योधनाचा लहान भाऊ दु:शासन बनले होते. नसीरूद्दीन शाह, ओमपुरी, पंकज कपूर, सतीश शाह यासारखे दिग्दज कलाकार यात होते. त्यामुळेच विधू विनोद चोपडा यांच्यावर कुणाचेही लक्ष गेले नाही. चित्रपटातील या दृश्यात विधू मोठ्या मोठ्या मिशा आणि लांब केसांमध्ये दिसले. कदाचित त्याचमुळे त्यांना कुणी ओळखू शकले नसावे.