Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video : ​‘तुतक तुतक तुतिया’चे ट्रेलर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2016 21:22 IST

सोनू सूदचा निर्माता म्हणून पहिलाच चित्रपट ‘तुतक तुतक तुतिया’चा ट्रेलर इंटरनेटवर दाखल झाला आहे.

सोनू सूदचा निर्माता म्हणून पहिलाच चित्रपट ‘तुतक तुतक तुतिया’चा ट्रेलर इंटरनेटवर दाखल झाला आहे. प्रभूदेवा, सोनू सूद आणि तमन्नाची प्रमुख भूमिका असलेला हा  हॉरर-कॉमेडी सिनेमा आहे.यामध्ये प्रभूदेवाचे स्वप्न असते की, एका अतिसुंदर मॉडेलशी त्याचे लग्न व्हावे. परंतु तसं काही होत नाही. त्याच्या बायकोच्या अंगात भूत येते, अशी त्याला भीती वाटत असते. सोनू एका अभिनेत्याच्या भूमिकेत आहे. डान्स, विनोद, भन्नाट गाणी असा संपूर्ण मसाला या चित्रपटात पाहायला मिळणार असं दिसतेय.ट्रेलरमध्ये निवेदक म्हणून शाहरुखने आवज दिला आहे तर फराह खानचासुद्धा केमिओ आहे. ट्रेलरची मुख्य आकर्षण मात्र प्रभूदेवाचा निरागस अभिनय आणि डान्स! सात आॅक्टोबर रोजी हा चित्रपट रिलीज होत आहे.