Join us
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: ​सिंगर पपॉन अडचणीत! रिअ‍ॅलिटी शोमध्ये स्पर्धक मुलीला चुकीच्या पद्धतीने केले किस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2018 11:16 IST

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध पार्श्वगायक पपॉन सध्या वादात सापडला आहे. ‘द वॉईस इंडिया किड्स’ या म्युझिक रिअ‍ॅलिटी शोच्या एका अल्पवयीन कटेस्टंटला चुकीच्या पद्धतीने किस करून पपॉनने वाद ओढवून घेतला आहे.

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध पार्श्वगायक पपॉन सध्या वादात सापडला आहे. ‘द वॉईस इंडिया किड्स’ या म्युझिक रिअ‍ॅलिटी शोच्या एका अल्पवयीन कटेस्टंटला चुकीच्या पद्धतीने किस करून पपॉनने वाद ओढवून घेतला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यानंतर  हे प्रकरण राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाकडे पोहोचले आहे. तुम्हाला ठाऊक असेलच की, पपॉन या शोला जज करतो आहे.दरम्यान, पपॉनच्या मॅनेजरने हेआरोप धुडकावून लावले आहेत. त्या मुलीला कोणतीच इजा पोहोचवण्याचा किंवा तिच्याशी चुकीचे वागण्याचा आमचा हेतू नसल्याचे या मॅनेजरने स्पष्ट केले आहे.खुद्द  पपॉनने आपल्या फेसबुकपेजवर एक लाईव्ह व्हिडिओ शेअर केला आहे. ‘द वॉईस इंडिया किड्स’चा होळी स्पेशल एपिसोड शूट केल्यानंतर पपॉन शोच्या मुलांसोबत आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसून मौज मस्ती करताना यात दिसतोय. याच व्हिडिओच्या अखेरिस पपॉन एका मुलीला चुकीच्या पद्धतीने किस करताना दिसतोय.  यानंतर लगेच पपॉन फेसबुक लाईव्ह बंद करण्याचे आदेश देतानाही यात दिसतोय. मंगळवारी अपलोड करण्यात आलेला हा व्हिडिओ आत्तापर्यंत ७० हजारांवर लोकांनी पाहिला आहे. सोशल मीडियावर पपॉनच्या या कृत्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एका वकीलाने यांदर्भात राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाला पत्र लिहिले आहे. रानू भूयन असे या वकीलाचे नाव आहे. सिंगर पपॉन महांताने होळीचे रंग लावत एका मुलीला चुकीच्या पद्धतीने किस केले, हे पाहून मला धक्का बसला आहे. मी व्हिडिओ पाहिला आहे. संपूण देशातील प्रतिभावान मुलांना हा रिअ‍ॅलिटी शो खुणावत आहे. अशात मी मुलांच्या सुरक्षा आणि संरक्षणाबद्दल चिंतीत आहे, असे भूयन यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे. विशेष म्हणजे, पपॉनच्या एका फॅनक्लबने ४० लोकांविरोधात एफआयआर दाखल केला. या लोकांनी पपॉनची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप संबंधित फॅनक्लबने केला आहे.ALSO READ : 'द वॉईस इंडिया किड्स'मध्ये शोले स्टाइल होळी सेलिब्रेशन्स