Join us

​VIDEO : पहा थरार, ‘जो जिता यहा है...रुस्तम वही!’ गाण्यातून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 18:42 IST

‘रुस्तम’ चित्रपटाचा प्रदर्शित ट्रेलर आणि गाणे अक्षयच्या चाहत्यांना भूरळ घालत असतानाच या चित्रपटाचे आणखी एक थरारक गाणे लॉंच करण्यात आले.

‘रुस्तम’ चित्रपटाचा प्रदर्शित ट्रेलर आणि गाणे अक्षयच्या चाहत्यांना भूरळ घालत असतानाच या चित्रपटाचे आणखी एक थरारक गाणे लॉंच करण्यात आले. ‘जो जिता यहा है...रुस्तम वही...’ या दोन मिनिटाच्या गाण्यातून चित्रपटातील थरार अनुभवास येत आहे. अक्षय कुमार या चित्रपटातून रुस्तम पावरी या नौदल अधिकाºयाची भूमिका साकारत असून स्वत: अक्षयने ट्विट करत त्याच्या चाहत्यांना ‘रुस्तम वही!’ या गाण्याबद्दल माहीती दिली. या चित्रपटातील हे गाणे सुकृती कक्तर आणि राघव सचर यांनी स्वरबद्ध केले आहे. ‘थ्री शॉट्स दॅट शॉक्ड् द नेशन’ अशा ‘टॅगलाइनसह’ टिनू सुरेश देसाईच्या दिग्दर्शनात बललेल्या या चित्रपटात अक्षय कुमार, इलियाना डिक्रूज, एशा गुप्ता, अर्जन बाजवा, परमीत सेठी हे कलाकार झळकणार आहेत. आशुतोष गोवारीकरचा ‘मोहेंजोदारो’ आणि ‘रु स्तम’ हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार असल्यामुळे प्रेक्षकांना इतिहास भावतो कि इतिहासातील थरार हे लवकरच कळणार आहे.