विशेष म्हणजे सलमानच्या या टूरमधील कलाकारांचे काही फोटोज् कालच समोर आले आहेत. जेव्हा हे सर्व कलाकार मुंबई येथून टूरसाठी रवाना झाले तेव्हा त्यांना कॅमेºयात कैद करण्यात आले. असो, शोमध्ये सलमान जबरदस्त परफॉर्मन्स करणार आहे. त्यामुळे त्याच्या या शोमध्ये फॅन्सची जबरदस्त गर्दी होण्याची शक्यता आहे. शिवाय तिकीट विक्रीही जोरदार सुरू असल्याने सलमानचा हा टूर धमाकेदार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सूत्रानुसार सलमान १६ एप्रिल म्हणजे आज हॉँगकॉँग येथे परफॉर्मन्स करणार आहे. पुढे २१ एप्रिल रोजी तो आॅकलॅण्ड, न्यूझीलंडमध्ये परफॉर्मन्स करणार आहे. यादरम्यान सलमानसोबत बिपाशा बसू, सोनाक्षी सिन्हा, प्रभू, बादशाह आणि डेजी शाह सहभागी होणार आहेत. तब्बल १४ वर्षांनंतर सलमान आणि बिपाशा एकत्र येणार आहेत. त्यामुळे बिपाशा जबरदस्त एक्सायटेड असल्याचे तिने अगोदरच स्पष्ट केले आहे.}}}} ">Rehearsals for the 1st show in Hongkong tomo ! #DaBangHKpic.twitter.com/hqe5NRn2lI— Salman Khan (@BeingSalmanKhan) April 15, 2017
Video : सलमान खानच्या ‘द बॅँग टूर’च्या रिहर्सलचा पहा व्हिडीओ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2017 14:34 IST
सध्या बॉलिवूडमध्ये सर्वाधिक व्यस्त स्टार कोणी असेल तर त्यामध्ये दबंग सलमान खान याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.
Video : सलमान खानच्या ‘द बॅँग टूर’च्या रिहर्सलचा पहा व्हिडीओ!
सध्या बॉलिवूडमध्ये सर्वाधिक व्यस्त स्टार कोणी असेल तर त्यामध्ये दबंग सलमान खान याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. ‘टायगर जिंदा हैं’च्या शूटिंगमधून थोडीसी विश्रांती मिळालेल्या सलमानने लगेचच त्याच्या ‘द बॅँग टूर’च्या रिहर्सलला सुरुवात केली आहे. त्याच्यासोबतचे इतर कलाकार गेल्या कित्येक महिन्यांपासून या टूरची रिहर्सल करीत असून, सलमानही आता त्यांना ज्वाइंन झाला आहे. या टूरच्या माध्यमातून सलमान बºयाच कालावधीनंतर लाइव्ह आॅडियन्सच्या समोर परफॉर्मन्स करणार आहे. काही दिवसांपासूनच सलमानने अवॉर्ड शोमध्ये जाण्यास सुरुवात केली आहे. सलमानच्या या टूरला आजपासून हॉँगकॉँग येथून सुरुवात होणार आहे. काल रात्रीच सलमानने त्याच्या ट्विटर अकाउंटवर टूर रिहर्सलचा एक व्हिडीओ त्याच्या फॅन्ससाठी शेअर केला आहे.