Join us

Video : गिली गिली छू... प्रियांकाने चालता-चालता गायब केली 'ती' अंगठी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 16:45 IST

प्रियंका चोप्रा आणि निक जोनस यांच्या अफेअरची माहिती आता सर्वांनाच झाली आहे. इतकेच नाही तर दोघांनी एन्गेजमेंट केल्याचही बोललं जात आहे.

मुंबई : प्रियंका चोप्रा आणि निक जोनस यांच्या अफेअरची माहिती आता सर्वांनाच झाली आहे. इतकेच नाही तर दोघांनी एन्गेजमेंट केल्याचही बोललं जात आहे. या साखरपुड्याच्या चर्चांनंतर सर्वांच्या नजरा या प्रियंकाच्या चेहऱ्यापेक्षा तिच्या हातांकडे अधिक राहत आहे. अशात प्रियंका दिल्ली आपली अंगठी लपवताना कॅमेरात कैद झाली आहे. 

झालं असं की, प्रियंका निक जोनसचा सिंगापूर येथील लाइव्ह शो आटोपून दिल्लीला होती. यावेळी एअरपोर्टवर तिला स्पॉट करण्यात आलं. यावेळी काही फॅन्ससोबत तिने फोटोही काढले. तर बाहेर येताना तिने चलाखीने अंगठी काढून खिशात ठेवली. पण तिची ही चलाखी कॅमेरात पकडली गेली आहे. 

प्रियंकाचा हा अंगठी लपवतानाचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. प्रियंकाने अंगठी का लपवली? जर तिचा साखरपुडा झाला आहे तर ती हे का लपवते आहे? असे प्रश्नही चाहते विचारत आहेत.

दरम्यान, प्रियंका आणि निक जोनसचा सिंगापूरमधील एका पबमधील व्हिडीओही व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत दोघे एन्जॉय करताना दिसत आहेत. प्रियंकाचा हा व्हिडीओ एका फॅन क्लबमध्ये शेअऱ करण्यात आलाय.

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनासबॉलिवूडसेलिब्रिटी