Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: भिकारी समजून सारा अली खानला लोकांनी दिले होते पैसे, तिनेच सांगितला हा मजेशीर किस्सा

By तेजल गावडे | Updated: September 23, 2020 17:05 IST

सारा अली खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे.

सारा अली खानचे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणातील ड्रग्स कनेक्शनमध्ये साराचेदेखील नाव समोर येत आहे. यादरम्यान सोशल मीडियावर साराचा थ्रोबॅक व्हिडिओ खूप व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत सारा अली खान आपल्या बालपणीची एक किस्सा शेअर करते आहे. या व्हिडिओत सारा सांगते आहे की, एकदा ती रस्त्याच्या कडेला डान्स करत होती. तेव्हा लोक तिला भिकारी समजून पैसे देऊ लागले होते आणि ते तिने ठेवलेदेखील.

सारा अली खान या व्हिडिओत सांगताना दिसते आहे की, एकदा ती वडील सैफ अली खान, आई अमृता सिंग व भाऊ इब्राहिमसोबत आउटिंगला निघाली होती. त्यादरम्यान आई आणि पप्पा काहीतरी विकत घेण्यासाठी दुकानाच्या आत गेले. शॉपबाहेर मी, भाऊ आणि हाउस हेल्परसोबत उभे होते. मी अचानक डान्स करायला सुरूवात केली. लोकांनी तिथे थांबून मला पैसे द्यायला सुरूवात केली. कारण त्यांना वाटले की मी भिख मागते आहे. मी ते पैसे ठेवले. त्यावेळी मला वाटले की पैसे मिळत आहेत तर काहीही करा आणि करत रहा. मग मी पुन्हा डान्स केला.

सारा अली खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पाहिला जातो आहे. सारा अली खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिने केदारनाथ चित्रपटातून पदार्पण केले आहे. या चित्रपटात तिच्यासोबत दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटासाठी साराला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कारदेखील मिळाला.

त्यानंतर सारा सिंबा व लव आजकलमध्ये झळकली. आगामी चित्रपटाबद्दल सांगायचं तर सारा लवकरच कुली नंबर १मध्ये दिसणार आहे. यात तिच्यासोबत वरूण धवन मुख्य भूमिकेत आहे. तसेच ती अतरंगी रे चित्रपटातही दिसणार आहे.

टॅग्स :सारा अली खानसुशांत सिंग रजपूतसिम्बाकेदारनाथ