बॉलिवूडमध्ये दिसलेल्या ‘या’ पाकी अभिनेत्रीचा हा व्हिडिओ होतोयं व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2018 14:21 IST
२०१३ मध्ये बॉलिवूड फिल्म ‘हफ्फ ! इट्स टू मच’ या चित्रपटात अरमीना दिसली होती. मात्र हा चित्रपट दणकून आपटला होता. त्यामुळे अरमीना बॉलिवूडमधून गायब झाली
बॉलिवूडमध्ये दिसलेल्या ‘या’ पाकी अभिनेत्रीचा हा व्हिडिओ होतोयं व्हायरल!
पाकिस्तानी अभिनेत्री अरमीना खान ही कदाचित तुमच्या विस्मृतीत जावू शकते. होय, २०१३ मध्ये बॉलिवूड फिल्म ‘हफ्फ ! इट्स टू मच’ या चित्रपटात अरमीना दिसली होती. मात्र हा चित्रपट दणकून आपटला होता. त्यामुळे अरमीना बॉलिवूडमधून गायब झाली आणि पुढे कधीच दिसली नाही. आता इतक्या वर्षानंतर या पाकिस्तानी अभिनेत्रीची आठवण होण्याचे कारण म्हणजे, तिचा आगामी चित्रपट. होय, अरमीनाचा ‘शेरदिल’ या आगामी चित्रपटाचा टीजर रिलीज झाला आहे. आपल्या सोशल अकाऊंटवर अरमीनाने हा टीजर रिलीज केला. अरमीनाचा हा चित्रपट १९६५ च्या भारत-पाक युद्धावर आधारित आहे. यात हवाई दलाची कथा सांगितली जाणार आहे. या चित्रपटाची कथा अद्याप कळलेली नाही. पण टीजरवरून या चित्रपटात अॅक्शनपासून कॉमेडीपर्यंत सगळे काही दिसणार, हे स्पष्ट आहे. या चित्रपटात अरमीनासोबत मिकाल जुल्फीकार आहे. अरमीन खान ही पाकिस्तानी - कॅनडियन वंशाची आहे. टीव्हीपासून मॉडेलिंगपर्यंत जगात नेहमी प्रकाशझोतात राहणारी अरमीनाचे नाव पाकिस्तानच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये घेतले जाते.अरमीना पाकिस्तानची पहिली अभिनेत्री आहे, जी २०१३ मध्ये कान्स फिल्म फेस्टिवलपर्यंत पोहोचली. याठिकाणी अरमीनाने बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची भेट घेतली होती. नवाजुद्दीनसोबतचा एक फोटोही तिने आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केला होता. ALSO READ : तर काय माहिरा खानचे रणबीर कपूरसोबत झाले ब्रेकअप?पाकिस्तानचे अनेक कलाकार बॉलिवूडमध्ये दिसले आहेत. अभिनेत्री माहिरा खान, सबा कमर, अभिनेता फवाद खान आदींचे नाव यात घेता येईल. तूर्तास पाकच्या कलाकारांना भारतात प्रतिबंध करण्यात आला आहे. सीमेवरच्या पाकच्या कुरापती सुरूच असल्याने भारताकडून काही कठोर निर्णय घेतले गेले आहेत. त्याअंतर्गत पाक कलाकारांना भारतात प्रतिबंध करण्यात आला आहे.