Join us

‘बाहुबली २’ चा व्हिडीओ लीक : सोशल मीडियावर चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2016 18:35 IST

एस.एस. राजमौली यांचा बहुचर्चित चित्रपट ‘बाहुबली २’चा दोन मिनिटांचा एक व्हिडिओ लीक झाला आहे. लीक झालेल्या व्हिडिओमध्ये युद्धाचे चित्रिकरण ...

एस.एस. राजमौली यांचा बहुचर्चित चित्रपट ‘बाहुबली २’चा दोन मिनिटांचा एक व्हिडिओ लीक झाला आहे. लीक झालेल्या व्हिडिओमध्ये युद्धाचे चित्रिकरण सुरू असल्याचे दिसते. प्रभास व अनुषा हे युद्धाची रणनीती आखताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. सुरुवातीला हा लीक झालेला भाग यू-ट्यूबवर व्हायरल झाला होता. मात्र या लीक शॉटवर यू-ट्यूबवर बंदी लावण्यात आली. ट्रेन्डनुसार हा लीक झालेला व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल होत असून, आता फक्त व्हॉट्सअ‍ॅपवरून शेअर केला जात आहे. लीक झालेल्या व्हिडीओमध्ये शूटिंगनंतर व्हीएफएक्सवर काम होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये प्रभास व अनुषा आपल्या सैन्यासोबत सीमेचे रक्षण करताना दिसत आहेत.‘बाहुबली’ या चित्रपटाच्या पहिल्या भागाचा शेवट ‘कटप्पाने बाहुबलीला का मारले’ या प्रश्नाने होत असल्याने दुसºया भागातून याचे उत्तर मिळणार अशी अपेक्षा सर्वांनाच होती. नव्या व्हिडीओमधून याचा खुलासा होईल अशी अपेक्षा अनेकांची असली तरी ती सध्या तरी फोल ठरली आहे. दरम्यान हॅकर्स व पायरसीचा दंश ‘बाहुबली’ला लागला असल्याचा अंदाज व्हिडीओ लीकमुळे लावण्यात येत आहे. ट्विटरवरून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.निर्मात्यांकडून या व्हिडीओला व्हायरल करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. काही लोक या लीक व्हिडीओला शेअर करीत नसल्याचे सांगण्यात येते. मात्र बाहुबलीच्या चाहत्यांसाठी व त्याची वाट पाहणाºयांसाठी हा व्हिडीओ लीक होणे एक पर्वणीच ठरली आहे. बाहुबलीचा दुसरा भाग पुढील वर्षी १७ एप्रिलला रिलीज होणार आहे. }}}} ">http://