Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: प्रेग्नेंसीत थिरकताना दिसली करीना कपूर, बेबी बंपमध्ये डान्स करताना व्हिडीओ झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 11:59 IST

अभिनेत्री करीना कपूर खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत प्रेग्नेंट करीना कपूर खान डान्स करताना दिसते आहे. या व्हिडीओत करीना कपूर खूप सुंदर दिसते आहे. हा व्हिडीओ तिच्या हेअर स्टाइलिस्टने सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान दुसरी प्रेग्नेंसी खूप एन्जॉय करते आहे. तिचा नवरा आणि अभिनेता सैफ अली खानचे म्हणणे आहे की ती फेब्रुवारीच्या सुरूवातीला दुसऱ्या बाळाला जन्म देऊ शकते. नवीन बाळाच्या जन्माआधी सैफ अली खान आणि करीना कपूर मुलगा तैमूरसोबत नवीन घरात शिफ्ट झाले आहेत. करीनाने त्याची झलक सोशल मीडियावर दाखवली आहे. सध्या ती सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे.

करीना कपूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. या व्हिडीओत प्रेग्नेंट करीना कपूर डान्स करताना दिसते आहे. या व्हिडीओत ती खूप सुंदर दिसते आहे. यात तिने नारंगी रंगाचा फुल स्लीव टॉप आणि लाइट नारंगी रंगाचा स्कर्ट घातला आहे. स्कर्ट हातात पकडून ती डान्स करताना दिसते आहे. 

खरेतर हा व्हिडीओ कोणते तरी प्रमोशन शूट आहे. करीना कपूरचा हा व्हिडीओ हेअर स्टायलिस्ट यिआन्नी त्सापतोरीने शेअर केला आहे. या शूटसाठी यिआन्नीने करीनाची हेअरस्टाइल केली आहे. या व्हिडीओत करीनाने पोनी बांधली आहे. प्रेग्नेंट असूनही करीना खूप सुंदरतेने शूट करण्यासाठी मदत करते आहे. तिच्या चेहऱ्यावर कॉन्फिडंस दिसतो आहे. 

करीना कपूरने प्रेग्नेंसीदरम्यान लाल सिंग चड्ढा चित्रपटाचे आमिर खानसोबत दिल्लीत शूटिंग केले होते. कोरोना व्हायरसच्या संकटादरम्यान कित्येक जाहिरातीचे शूटिंग आणि तिने प्रवासदेखील केला. दिवाळीत करीना सैफसोबत हिमाचल प्रदेशमध्ये व्हॅकेशन एन्जॉय केले.

टॅग्स :करिना कपूरसैफ अली खान