Join us

VIDEO: जॅकलिन फर्नांडिस व या अभिनेत्रीमध्ये विमानात चढण्यावरुन झाली भांडणं, व्हिडिओत दिसल्या धक्काबुक्की करताना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 17:37 IST

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे विमानात पहिले चढण्यावरून झाले भांडणं, पहा हा व्हिडिओ

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. तिचे फोटो व व्हिडिओ पाहता पाहता सोशल मीडियावर व्हायरल होतो. नुकतेच जॅकलिन आणि लिसा हेडन यांचा एक व्हिडिओ इंटरनेटवर खूप व्हायरल होतो आहे. खरेतर या व्हिडिओत जॅकलीन व लिसा विमानात चढताना एकमेकांशी भांडताना दिसते.

कधी जॅकलिन तर कधी लिसा एकमेकांना विमानात चढण्यापासून थांबवत आहेत आणि एकमेकांना मागे खेचत आहेत. सोबतच मारताना दिसत आहे. या व्हिडिओत ब्राउन कलरच्या आउटफिटमध्ये अभिनेत्री लिसा हेडन दिसते आहे. तर व्हाइट आऊटफिटमध्ये जॅकलिन दिसते आहे.

जॅकलिन फर्नांडिस आणि लिसा हेडनचा हा व्हिडिओ फिल्मी किडा 123 च्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत पहायला मिळतंय की, कसे जॅकलिन व लिसा मस्ती करताना दिसत आहे.

व्हिडिओला आतापर्यंत 35 हजारांहून जास्त व्ह्युज मिळाले आहेत. जॅकलिन व लिसाच्या या व्हिडिओवर चाहते खूप कमेंट करत आहेत आणि प्रतिक्रिया देत आहेत.

जॅकलिन फर्नांडिसने अलादीन चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत रितेश देशमुख मुख्य भूमिकेत दिसणार आहे. जॅकलिनला खरी ओळख किक चित्रपटातून मिळाली. या चित्रपटातील तिच्या कामाची खूप प्रशंसा झाली होती. मागील वर्षी जॅकलिन फर्नांडिस व सुशांत सिंग राजपूत ड्राइव्ह सिनेमात दिसली होती.

टॅग्स :जॅकलिन फर्नांडिस