Join us

Video:'सिक्रेट सुपरस्टार' सिनेमासाठी आमिर खानने केलेला नवीन लूक तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 12:22 IST

या व्हिडीओत प्रत्येकजण आमिरच्या या लूकवर सिनेमाची टीम आपापल्या प्रतिक्रिया देत आहे. अभिनेत्री जायरा वसिम, किरण राव, दिग्दर्शक अद्वैत चंदन, सान्या मल्होत्रा, मेहेर विजपासून मोनाली ठाकूर यांनी चित्रविचित्र शक्ती कुमार म्हणजेच आमिरच्या लूकवर आपल्या प्रतिक्रिया दिल्यात. हा लूक पाहून कुणालाही त्यांचं हसू आवरत नाही. शक्ती कुमार हा एक संगीत दिग्दर्शक असून त्याची वाईट परिस्थिती ओढवली असते. एका प्रमुख अभिनेत्यासाठी अशा प्रकारची व्यक्तीरेखा लिहणं हे कठीण असल्याचे किरण रावनं सांगितले आहे.

मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानचा सिक्रेट सुपरस्टार हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात आमिरने शक्ती कुमार नावाची ही भूमिका साकारली आहे. या सिनेमातील आमिरचा लूक त्याने आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळा असणार आहे. दंगल सिनेमात आमिरने कुस्तीपटूला साजेसा लूक फिट आणि वेगळा लूक साकारला होता. मात्र त्या भूमिकेपेक्षा वेगळा लूक आमिरचा सिक्रेट सुपरस्टारमध्ये रसिकांना पाहायला मिळणार आहे. हा विचित्र हेअर स्टाईल, अतरंगी दाढी आणि रंगीबेरंगी आणि हटके कपडे या अवतारात शक्ती कुमार म्हणजेच आमिर खान पाहायला मिळणार आहे. आमिरच्या लूकची सध्या जोरदार चर्चा आहे. या लूकचा व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओत प्रत्येकजण आमिरच्या या लूकवर सिनेमाची टीम आपापल्या प्रतिक्रिया देत आहे. अभिनेत्री जायरा वसिम, किरण राव, दिग्दर्शक अद्वैत चंदन, सान्या मल्होत्रा, मेहेर विजपासून मोनाली ठाकूर यांनी चित्रविचित्र शक्ती कुमार म्हणजेच आमिरच्या लूकवर आपल्या प्रतिक्रिया दिल्यात. हा लूक पाहून कुणालाही त्यांचं हसू आवरत नाही. शक्ती कुमार हा एक संगीत दिग्दर्शक असून त्याची वाईट परिस्थिती ओढवली असते. एका प्रमुख अभिनेत्यासाठी अशा प्रकारची व्यक्तीरेखा लिहणं हे कठीण असल्याचे किरण रावनं सांगितले आहे. शक्ती कुमार हा फुल ऑन रोमँटिक असून विविध मुलींवर तो प्रेम करतो. शक्ती कुमारमध्ये ते सर्व गुण आहेत जे कुण्याही सामान्य व्यक्तीमध्ये असतील असं आमिरने या व्हिडीओमध्ये सांगितले. दिग्दर्शक अद्वैत चंदननंही आमिरच्या या लूकवर प्रतिक्रिया दिली आहे. आमिरला रियल लाइफमध्येही अशाप्रकारे टाईट टी-शर्ट परिधान करायला नक्कीच आवडलं असणार असं ते म्हणालेत. शक्ती कुमारच्या लूकसाठी टीममधील प्रत्येकावर विविध लूक ट्राय करण्यात आले. बरेच लूक ट्राय केल्यानंतर शक्ती कुमारचा लूक अंतिम करण्यात आला. पहिल्यांदाच आमिर या सिनेमात विचित्र आणि वेगळ्या पद्धतीने नाचताना, धम्माल मस्ती करताना पाहायला मिळणार आहे. सध्या या सिनेमाचा प्रोमो रसिकांना चांगलाच भावतोय. यांत जायरा वसिम रसिकांना अपील करत असल्याचं पाहायला मिळतंय. सिनेमाची गाणीही रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतायत. हा सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर १९ ऑक्टोबरला रसिकांच्या भेटीला येत आहे. Also Read:आमिरच्या ‘सिक्रेट सुपरस्टार’चा टीझर रिलीज