Join us

Video! स्वरा भास्करच्या ‘अनारकली आॅफ आरा’चे Deleted बोल्ड सीन्स लीक!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2017 16:31 IST

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिचा ‘अनारकली आॅफ आरा’ हा चित्रपट प्रदर्शनाआधीच चर्चेत आहे. स्वराच्या या चित्रपटात अनेक बोल्ड सीन्स आहेत. यापैकी काही सीन्सवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेत, ते चित्रपटातून गाळण्याचे निर्देश दिले होते. पण आता हेच चित्रपटातून गाळण्यात आलेले सीन्स सोशल मीडियावर लीक झाले आहेत

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिचा ‘अनारकली आॅफ आरा’ हा चित्रपट प्रदर्शनाआधीच चर्चेत आहे. स्वराच्या या चित्रपटात अनेक बोल्ड सीन्स आहेत. यापैकी काही सीन्सवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेत, ते चित्रपटातून गाळण्याचे निर्देश दिले होते. पण आता हेच चित्रपटातून गाळण्यात आलेले सीन्स सोशल मीडियावर लीक झाले आहेत. यु ट्यूबवर लीक झालेले हे सीन्स बरेच बोल्ड आहेत. या लीक झालेल्या व्हिडिओत तीन सीन्स आहेत. एक सीनमध्ये पंकज त्रिपाठी दिसतो आहे. दुसºया सीनमध्ये स्वरा भास्कर दिसतेय. यात ती पाठमोरी उभी आहे. तिसरा सीन संजय मिश्रा व स्वरा भास्करवर चित्रीत करण्यात आला आहे. यात तो स्वरावर बळजबरी करताना दिसतोय. ‘अनारकली आॅफ आरा’ चे दिग्दर्शक अविनाश दास यांनी या लीक झालेल्या सीन्सवर नाराजी व्यक्त केली आहे. चित्रपटातील काही सीन्स लीक झाल्याची बातमी मला मीडियाकडूनच कळली. रिलीजपूर्वी चित्रपटाचे कुठलेही सीन्स लीक होणे निश्चितपणे दुर्दैवी बाब आहे. पण ‘उडता पंजाब’ लीक होऊ शकतो तर माझ्या चित्रपटालाही हा धोका आहेच, असे ते म्हणाले.   या लीक सीन्समुळे चित्रपटाच्या रिलीजवर कुठलाही परिणाम होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘अनारकली आॅफ आरा’ ही बिहारच्या आरा जिल्ह्यातील द्विअर्थी गाणे गाणारी एक गायिका आहे. अचानक तिच्या आयुष्यात एक वादळ येते आणि ती एका प्रभावशाली व्यक्तिच्या अत्याचाराची शिकार ठरते. पण त्याच्यापुढे गुडघे न टेकवता ती त्याच्याविरूद्ध लढण्याचा निर्णय घेते, अशी या चित्रपटाची कथा आहे.