Join us
Daily Top 2Weekly Top 5

video : ​रस्त्यावर डोसा विकतेयं मल्याळम कविता लक्ष्मी; वाचा, कुणी आणली तिच्यावर ही वेळ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 13:21 IST

मल्याळम अभिनेत्री कविता लक्ष्मी सध्या रस्त्यांवर डोसा विकतांना दिसते आहे. रस्त्याच्या कडेला एका ठेल्यावर डोसा विकतानाचा कविता लक्ष्मीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आता

कविता लक्ष्मी हे नाव तुमच्या फारसे परिचयाचे असण्याची शक्यता नाहीच. पण मल्याळम मनोरंजन सृष्टीसाठी हे नाव नवे नाही. अनेक मल्याळम मालिकात कविता लक्ष्मी झळकली असल्याने मल्याळममधील ती एक चिरपरिचित चेहरा आहे. ‘स्त्रीधनम’ या गाजलेल्या मल्याळम टीव्ही मालिकेतील कविता लक्ष्मीने संथा नामक पात्र साकारले होते. तिची ही भूमिका प्रचंड गाजली होती. कविता लक्ष्मीबद्दल इतकी माहिती देण्याचे कारण काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर आहे.होय, ही एकेकाळची गाजलेली मल्याळम अभिनेत्री सध्या रस्त्यांवर डोसा विकतांना दिसते आहे. रस्त्याच्या कडेला एका ठेल्यावर डोसा विकतानाचा कविता लक्ष्मीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आता तुम्हाला हा एखाद्या चित्रपटातील सीन वाटू शकतो. पण रिल लाईफ सीन नाही तर कविता लक्ष्मीचा रिअल लाईफ सीन आहे. डोसा विकून पोट भरण्याची वेळ कविता लक्ष्मीवर का यावी, यामागची कहानी कुठल्या चित्रपटापेक्षा कमी नाही.होय, कविता लक्ष्मी रस्त्याच्या कडेला डोसा विकून पोट भरतेय. एका व्यक्तिने कविताला ओळखले आणि तिची कहानी जगापुढे आणली. एका ट्रव्हल एजन्सीमुळे कविता लक्ष्मीवर ही वेळ आली. या ट्रव्हल एजन्सीच्या फसव्या आश्वासनांना कविता लक्ष्मी भुलली आणि ती रस्त्यावर आली. या ट्रव्हल एजन्सीने कविता लक्ष्मीच्या मुलाला ब्रिटनमध्ये शिक्षण व नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. फक्त एक लाख रुपए महिना द्या आणि या मोबदल्यात मुलाला ब्रिटनमध्ये शिक्षण आणि नोकरीची हमी आम्ही देतो, असे सांगून या ट्रव्हल एजन्सीने कविता लक्ष्मीला भुलवले. कविता लक्ष्मीसाठी त्यावेळी एक लाख रुपए महिना देणे सहज शक्य होते.  कविता लक्ष्मीने वर्षभराची फी या ट्रव्हल एजन्टकडे जमा केली. यानंतर कुठे आपली फसवणूक झाल्याचे कविता लक्ष्मीच्या लक्षात आले.  या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी कविता लक्ष्मीने ग्रनाईट शोरूम उघडले. बँकांकडून लोन घेण्याचे प्रयत्न केले. पण हे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. पुढे हे शो रूम तिला बंद करावे लागले आणि   पैशांसाठी रस्त्यांवर डोसा विकण्याची पाळी तिच्यावर आली. अर्थात कविला लक्ष्मीला याचे काहीही शल्य नाही. पण मला यात कसलीही लाज नाही. हॉटेलमध्ये काम करायलाही मी तयार आहे, असे तिने सांगितले.