Join us

VIDEO : ​अण्णा हजारेंच्या बायोपिकचा टिझर रिलीज !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2016 13:44 IST

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या बायोपिकचा टिझर नुकताच रिलीज झाला आहे..........

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या बायोपिकचा टिझर नुकताच रिलीज झाला आहे. अण्णांच्या बालापणापासून ते भ्रष्टाचाराविरोधात केलेला जीवनभराचा संघर्ष या  चित्रपटातून दाखविण्यात आला आहे. या टिझरमध्ये सैनिकापासून ते उपोषणांपर्यंतचा संघर्ष पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक उडापूरकर यांनी केलं असून त्यांनीच स्वत: अण्णांची भूमिका साकारली आहे. अभिनेत्री काजोलची बहीण तनिशा मुखर्जी एका महिला पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.टिझरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे. १४आॅक्टोबर रोजी हा सिनेमा रिलीज होत आहे.