Join us

VIDEO : बाबो..! अनन्या पांडेने चोरला होता ब्रिटीश एअरवेजचा नाइटसूट, खुद्द तिनेच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2020 11:17 IST

करीना कपूर आणि अनन्या पांडेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

करीना कपूर खान व्हॉट वूमन वॉन्ट सीझन ३ पुन्हा घेऊन आली आहे आणि या शोमध्ये ती सेलिब्रेटींना खूप मजेशीर प्रश्न विचारते. करीना कपूर खानच्या या शोमध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने हजेरी लावली होती. करीना कपूरने अनन्या पांडेने कित्येक मजेशीर प्रश्न विचारले आणि अनन्या पांडे या प्रश्नांचे उत्तर मजेशीर पद्धतीने दिले आहे. करीना कपूर आणि अनन्या पांडेचा हा शोच्या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळते आहे.

करीना कपूर खान या शोदरम्यान अनन्या पांडेला तिच्या लॉकडाउन लूकबद्दल विचारले. त्यावर अनन्या पांडे म्हणाली की, तिने ब्रिटीश एअरवेजमधून नाइट सेट चोरला होता आणि दररोज तेच परिधान करते. इतकेच नाही तर तिने सांगितले की, ती वडील चंकी पांडची लूज टीशर्टदेखील घातले आहे. इतकेच नाही तर करीना कपूरने जेव्हा अनन्या पांडेला कुकिंग स्किल्सबद्दल विचारले तेव्हा तिने सांगितले की, मला जेवण बनवायला अजिबात आवडत नाही आणि त्यामुळे मी किचनमध्येदेखील गेली नाही.

करीना कपूर खानने अनन्या पांडेला फॅशन आयकॉनबद्दल विचारले. तर तेव्हा तिने करीना कपूरचे नाव घेतले आहे. अनन्या पांडेने म्हटले की, जर तिने लग्न करेल तेव्हा मनीष मल्होत्राचा पिंक मजेंटा लहेंगा परिधान करणार आहे जो करीना कपूरने परिधान केला होता. नाहीतर ती लग्नच करणार नाही. या दोघांमधील खूप मजेशीर बातचीत झाली.

टॅग्स :करिना कपूरअनन्या पांडे