Join us
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO ALERT : पाहा, प्रियांका चोप्राच्या न्यूयॉर्कमधील घराची झलक अन् काही खास प्रश्नांची उत्तरे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2017 14:05 IST

लोकांना कसे बोलते करावे, हे ‘Vogue’ मॅगझिनला चांगलेच ठाऊक आहे.‘73 Questions’ सीरिज हे त्याचेच उदाहरण. या सीरिजअंतर्गत लोकप्रीय सेलिब्रिटींना रॅपिड फायर राऊंडमध्ये प्रश्न विचारले जातात. या सीरिजमध्ये अलिकडे प्रियांका चोप्राची वर्णी लागली.

लोकांना कसे बोलते करावे, हे ‘Vogue’ मॅगझिनला चांगलेच ठाऊक आहे.‘73 Questions’ सीरिज हे त्याचेच उदाहरण. या सीरिजअंतर्गत लोकप्रीय सेलिब्रिटींना रॅपिड फायर राऊंडमध्ये प्रश्न विचारले जातात. या सीरिजमध्ये अलिकडे प्रियांका चोप्राची वर्णी लागली. हॉलिवूडमध्ये प्रियांका चांगलीच लोकप्रीय झाली आहे. आॅस्कर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावण्यापासून पिपल्स चॉईस अवार्ड जिंकण्यापर्यंत प्रियांका हॉलिवूड गाजवते आहे. अमेरिकन मीडियालाही प्रियांकाची दखल घ्यावीशी वाटतेय, ते त्यामुळेच. ‘Vogue’  मॅगझिननेही प्रियांकाची दखल घेत,  ‘73 Questions’ सीरिजसाठी तिची निवड केली. आपल्या न्यूयॉर्कमधील अपार्टमेंटमध्ये प्रियांका या प्रश्नांना सामोरी गेली. यावेळी तिने टेलर स्विफ्टचे एक आवडते गाणेही गाऊन दाखवले.अमेरिकन नागरिकांना भारतीयांबद्दल काय गैरसमज बाळगतात, असे तुला वाटते, या प्रश्नाला प्रियांकाने मोठे मजेशीर उत्तर दिले. भारतातील प्रत्येकजण अरेंज्ड मॅरेज करतो, असा एक गैरसमज अमेरिकन लोकांना आहे. शिवाय ज्यांना भाषा बोलता येत नाही, ते भारतीय असेही अमेरिकन मानतात, असे प्रियांका म्हणाली.अमेरिकेतील तुझी सगळ्यांत आवडती गोष्ट कोणती? यावर येथील स्वातंत्र्य आणि येथील चिजबर्गर मला खूप आवडते, असे पीसीने सांगितले. प्रियांकाचे अमेरिकन भाषेतील उच्चारण फार वाईट नाही. पण बोस्टन उच्चारण? याबाबतीत मात्र प्रियांकाही साशंक आहे. मी यापुढे पुन्हा बोस्टन उच्चारण करणार नाही, असे प्रियांकाने सांगितले ते त्यामुळेच. प्रियांकाने आणखी कुठल्या कुठल्या प्रश्नांना काय काय उत्तरे दिलीत, निश्चितपणे हे पाहायला अन् ऐकायल तुम्हाला आवडेल. त्यासाठी तुम्हाला सोबत दिलेला व्हिडिओ बघावा लागेल.लवकरच प्रियांकाचा ‘बे वॉच’ हा पहिला-वहिला हॉलिवूडपट रिलीज होतो आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये प्रियांका सध्या व्यस्त आहे. प्रियांका या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सूक आहे.