Join us

विकी कौशलचा नवा रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2016 17:22 IST

रामन राघव २.० मध्ये विकी कौशलने पोलीस अधिकाºयाची भूमिका केली आहे. यामध्ये त्याला अमली पदार्थ ओढण्याचे व्यसन असते. या ...

रामन राघव २.० मध्ये विकी कौशलने पोलीस अधिकाºयाची भूमिका केली आहे. यामध्ये त्याला अमली पदार्थ ओढण्याचे व्यसन असते. या चित्रपटात कत्ल-ए-आम या गाण्यात डान्स क्लबमध्ये जाण्यापूर्वी तो पावडर ओढताना दाखविले आहे. विकी म्हणाला, ही आरोग्याला उपायकारक पावडर होती. जी त्याच्यासाठी तयार करण्यात आलेली होती. स्टार्च आणि ग्लुकॉन डी यांच्यापासून पावडर तयार करण्यात केली होती. ही पावडर ओढल्यानंतर पाच मिनिटांनी मला गोड चव लागत असे. यामुळे मला खूप मजा आली. कोणत्याही गाण्यासाठी कोरिओग्राफी करण्यात आलेली नव्हती. अगदी लग्नात नाचतो तशा पद्धतीने नाचा असे दिग्दर्शक अनुराग कश्यपने सांगितले होते.नवाजुद्दीन सिद्दीकीने या चित्रपटात सिरीअल किलरची भूमिका केली आहे. २४ जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल.