Join us
Daily Top 2Weekly Top 5

किंग खान शाहरुखच्या 'डंकी'मध्ये विकी कौशलची एन्ट्री; चाहत्यांना मोठं सरप्राइज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 15:33 IST

किंग खान शाहरुखसह अभिनेता विकी कौशलही 'डंकी' चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 

बॉलिवूड किंग शाहरुख खान आज (2 नोव्हेंबर) त्याचा 58 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी किंग खानने त्याच्या चाहत्याना सरप्राईज दिलं.  शाहरुखने त्याच्या 'डंकी' चित्रपटाचा टीझर  'डंकी ड्रॉप 1' या नावाने रिलीज केला आहे.  प्रदर्शित झाल्यानंतर काही क्षणातच हा टीझर  व्हायरल झाला आहे. 'डंकी'मध्ये विकी कौशलची एन्ट्रीने चाहत्यांना सुखद धक्का मिळाला. शाहरुखसह अभिनेता विकी कौशलही 'डंकी' चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 

'डंकी' चित्रपटात शाहरुख 'हार्डी'ची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत मुख्य भूमिकेत अभिनेत्री तापसू पन्नू पाहायला मिळणार आहे. तर तिच्याशिवाय या चित्रपटात विकी कौशलही हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. विकी कौशल सुखी नावाची भूमिका साकारत आहे. 'डंकी' चित्रपटाची गोष्ट हार्डी, सुखी, मनू, बग्गु आणि बाली या पाच मित्रांभोवती फिरते. या सर्वांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे की त्या सर्वांना लंडनला जायचे आहे.

'डंकी' चित्रपटाटे दिग्दर्शन राज कुमार हिरानी यांनी केले आहे. शाहरुख पहिल्यांदाच राजकुमार हिरानींच्या सिनेमात दिसणार आहे.  तर चित्रपटाचे लेखन हिरानी, अभिजात जोशी आणि कनिका धिल्लन यांनी केले आहे. 22 डिसेंबर ला 'डंकी' रिलीज होतोय.

किंग खानसाठी 2023 वर्ष हे खूप खास ठरलं. वर्षाच्या सुरवातीला 'पठाण' आणि त्यानंतर 'जवान' सिनेमाला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला. आता त्याचा तिसरा चित्रपट 'डंकी' देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यास सज्ज आहे. एकाच वर्षात किंग खानचा तिसरा चित्रपट पाहायला मिळणार असल्याने चाहते खूप उत्साहित आहेत.  

टॅग्स :शाहरुख खानविकी कौशलबॉलिवूड