Join us

बाबो! विकी कौशल वाढवणार 100 किलोपेक्षा जास्त वजन, साकारणार अश्वत्थामाची भूमिका

By गीतांजली | Updated: October 9, 2020 16:28 IST

अभिनेता विकी कौशल आगामी सिनेमा महाभारतमध्ये महान आणि अमर योद्धा अश्वत्थामाची भूमिका साकारणार आहे. या सिनेमाची शूटिंग एप्रिल 2021 ...

अभिनेता विकी कौशल आगामी सिनेमा महाभारतमध्ये महान आणि अमर योद्धा अश्वत्थामाची भूमिका साकारणार आहे. या सिनेमाची शूटिंग एप्रिल 2021 पासून सुरु होणार आहे. या सिनेमा 3 पार्टमध्ये रिलीज होणार आहे. यात विकी मॉर्डन अश्वत्थामाच्या भूमिकेत दिसणार आहे. महाभारतात अश्वत्थामाने कौरवांच्या बाजूने युद्ध केले होते.  

नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार विकी कौशल या भूमिकेसाठी वजन वाढवणार आहे. तब्बल अश्वत्थामाच्या भूमिकेसाठी विकी 100 किलोपेक्षा जास्त वजन वाढणार आहे. सध्या यासाठीच विकी वर्कआऊट करतो. हिती आहे. तो इज्राइल मार्शल आर्ट आणि जपानी मार्शल आर्ट्स शिकणार आहे. तसेच सिनेमात रॉयल लूक येण्यासाठी तो तलवारबाजी आणि तिरंदाजीचे प्रशिक्षणसुद्धा घेणार आहे. सिनेमाचे शूटिंग युरोपमध्ये सुरु होऊन मुंबईत संपणार आहे. ग्रीनलँड, आइसलँड व्यतिरिक्त इंग्लंड, टोकियो, न्यूझीलंड आणि नामीबिया हेदेखील असतील.

चित्रपटाचे शूटिंग आत्तापर्यंत सुरू झाले असते पण कोरोना व्हायरसमुळे हे पुढे ढकलण्यात आले आहे. सिनेमाचे दिग्दर्शन आदित्य धर करणार आहे. याआधी विकीच्या 'उऱी: द सर्जिकल स्ट्राईक' सिनेमाचे दिग्दर्शनही आदित्यने केले होते. या चित्रपटाशिवाय विकीकडे सध्या शहीद उधम सिंह, फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ बायोपिक आणि करण जोहरची 'तख्त' सारखे मोठे चित्रपट आहेत. 

Viral : सकाळी सकाळी लपत-छपत कतरिना कैफच्या घरी पोहोचला विकी कौशल!

 

टॅग्स :विकी कौशल