Join us  

विकी-कतरिनावर बाळासाठी कुटुंबियांचा दबाव? पहिल्यांदाच बेबी प्लॅनिंगविषयी बोलला अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 4:16 PM

Vicky kaushal: बाळासाठी विकी-कतरिनाला कुटुंबीय करतायेत घाई? अभिनेता म्हणतो...

बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी म्हणजे विकी कौशल आणि कतरिना कैफ. २०२१ मध्ये या जोडीने मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाची कलाविश्वात बरीच चर्चा रंगली होती. आता या दोघांच्या लग्नाला तीन वर्ष होत आली आहेत. त्यामुळे प्रत्येक जण त्यांना बेबी प्लॅनिंगविषयी प्रश्न विचारताना दिसतात. यामध्येच एका मुलाखतीमध्ये विकी कौशलने बाळाविषयी त्याच्या कुटुंबियांचं काय मत आहे हे सांगितलं.

विकी लवकरच सरदार उधम या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सध्या तो अनेक ठिकाणी सिनेमाचं प्रमोशन करत आहे. यामध्येच त्याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या बेबी प्लानिंग आणि कुटुंबियांचं मत यावर भाष्य केलं.

'लग्नानंतर घरचे बाळासाठी दबाव टाकत आहे का?' असा प्रश्न विकीला विचारण्यात आला. त्यावर, “नाही. आमच्या दोघांचं कुटुंब खूप छान आहे. ते आमच्यावर बाळासाठी कोणताही दबाव टाकत नाही. आमच्याकडची मोठी माणसं तशी फार कूल आहेत. माझ्या आई-वडिलांपासून कोणतीही गोष्ट लपवून ठेवत नाही. मी माझ्या आणि कतरिनाच्या नात्याविषयी सुद्धा पहिल्यांदा आई-वडिलांनाच सांगितलं होतं", असं विकी म्हणाला.

पुढे तो म्हणतो,"माझ्या आणि कतरिनाच्या अफेअरबद्दल पहिल्यांदा कोणाला कळलं असेल तर ते माझे आई-वडील होते.  त्यामुळे असा एकही दिवस आलेल नाही की एखादी गोष्ट व्हायरल झाली आणि मग ती त्यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांना आधीच सगळं ठावूक असतं."

टॅग्स :विकी कौशलकतरिना कैफसेलिब्रिटीसिनेमा