नुकताच पार पडलेल्या प्रतिष्ठित 'झी सिने अवॉर्ड्स २०२६' सोहळ्यात ऐतिहासिक 'छावा' चित्रपटाने आपला दबदबा निर्माण केला आहे. या सोहळ्यात बॉलिवूड सुपरस्टार विकी कौशल याला 'छावा'मधील छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या यशानंतर विकीने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली. त्यावर मराठी अभिनेता संतोष जुवेकर याने केलेली कमेंट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
विकीने पुरस्कार जिंकल्यानंतर 'झी सिने अवॉर्ड्स'चे आभार मानत ही पोस्ट आपल्या टीमला समर्पित केली. विकीने लिहिले, "हा पुरस्कार केवळ माझा नाही, तर 'छावा'च्या संपूर्ण टीमचा आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि निर्माते दिनेश विजान यांनी पहिल्या दिवसापासून माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. माझ्या चाहत्यांच्या प्रेमामुळेच हे शक्य झाले आहे आणि मी वचन देतो की, तुमच्या या प्रेमाला मी कधीच गृहीत धरणार नाही".
संतोष जुवेकरची कमेंट'छावा' चित्रपटात विकी कौशलसोबत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या संतोष जुवेकरने आपल्या सहकाऱ्याचे भरभरून कौतुक केले. संतोषने विकीच्या पोस्टवर कमेंट करत म्हटले, "पाजी, तुम्ही हे पूर्णपणे डिझर्व्ह करता... तुमचं खूप खूप अभिनंदन!".
विकीचे वडील शाम कौशल या पोस्टवर कमेंट करत लिहलं, "ही सगळी देवाची कृपा आहे आणि तुझ्या संपूर्ण टीमने घेतलेल्या मेहनतीचं फळ आहे. तू आणि तुझ्या सिनेमाच्या टीमने खरंच खूप मेहनत घेतली होती आणि तुम्हाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. तुझा खूप अभिमान वाटतोय…तुला जोर दी झप्पी! रब रखा!". तर विकीचा भाऊ सनी कौशलनं "जे बात मेरे शेर" असं लिहून अभिनेत्याचं कौतुक केलं आहे.
Web Summary : Vicky Kaushal won Best Actor at the Zee Cine Awards 2026 for 'Chhava.' He dedicated the award to his team. Santosh Juvekar and Vicky's family congratulated him on social media for his performance as Chhatrapati Sambhaji Maharaj.
Web Summary : विक्की कौशल ने 'छावा' के लिए ज़ी सिने अवार्ड्स 2026 में सर्वश्रेष्ठ अभिनेता का पुरस्कार जीता। उन्होंने पुरस्कार अपनी टीम को समर्पित किया। संतोष जुवेकर और विक्की के परिवार ने छत्रपति संभाजी महाराज के रूप में उनके प्रदर्शन के लिए सोशल मीडिया पर उन्हें बधाई दी।