Vicky Kaushal Birthday : बॉलिवूडचा 'नॅशनल क्रश' आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आज, १६ मे रोजी आपला ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. सोशल मीडियावर सकाळपासूनच त्याच्यावर चाहते, मित्रपरिवार आणि चित्रपटसृष्टीतील कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विकीचे वडील आणि बॉलिवूडचे प्रसिद्ध स्टंट डायरेक्टर श्याम कौशल यांनी त्याच्या सोबतचा एक फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. श्याम कौशल यांच्या या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
श्याम कौशल यांनी आपल्या लाडक्या लेकासाठी सोशल मीडियावर एक अत्यंत भावुक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी लिहिले, "तुझ्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा, बाळा. देवाचा आशीर्वाद तुझ्यावर राहो. खूप खूप प्रेम, आशीर्वाद आणि शुभेच्छा. तुझ्यासारखा मुलगा मिळाल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो. देवाचा आशीर्वाद तुझ्यावर सदैव राहो". या पोस्टवर विकीनं कमेंट करत लिहलं "मी तुमच्यावर खूप प्रेम आहे डॅड". तसेच विकीची पत्नी आणि अभिनेत्री कतरिना कैफ हिनंही इमोजी पोस्ट केले.
श्याम कौशल यांनी शेअर केलेल्या या फोटोमध्ये ते विकीसोबत सोफ्यावर बसून निवांत गप्पा मारताना दिसत आहेत. पण, फोटोमधील एका वेगळ्याच गोष्टीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोमध्ये सोफ्यावर ज्युनियर कौशल, म्हणजेच विकी कौशलचा मुलगा विहानचे कपडे एका बॉक्समध्ये दिसून येत आहेत. तसेच गोष्टींची पुस्तकेही दिसत आहेत. घरामध्ये लहान मूल असल्यावर जसे वातावरण असते, अगदी तसेच वातावरण या विकीच्या घरातही पाहायला मिळत आहे.
Web Summary : Vicky Kaushal celebrated his 38th birthday with warm wishes from family and fans. His father, Shyam Kaushal, shared an emotional post that captured attention. However, it was the glimpse of baby items on the sofa, hinting at domestic life, that truly intrigued fans.
Web Summary : विक्की कौशल ने परिवार और प्रशंसकों की शुभकामनाओं के साथ अपना 38वां जन्मदिन मनाया। उनके पिता, श्याम कौशल ने एक भावुक पोस्ट साझा किया जिसने ध्यान आकर्षित किया। हालाँकि, सोफे पर बच्चे की वस्तुओं की झलक ने प्रशंसकों को वास्तव में मोहित कर लिया।