Prakash Abitkar Thane News: ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठान आयोजित सूर आणि ताल यांचा अनोखा आनंदोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त हा सोहळा दरवर्षी आयोजित केला जातो. कलाक्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्वांना सोहळ्यात पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदाचा धर्मवीर आनंद दिघे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र (Jeetendra) यांना राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते देण्यात आला.
ठाणे प्रगतीशील शहर झालंय- जितेंद्र
"ठाणे हे गेल्या काही वर्षात खूप प्रगतीशील शहर झाले आहे. मी जेव्हा १५ वर्षांपूर्वी ठाण्यात आलो होतो तेव्हा ४५ मिनिटात यायचो, आता दीड तास लागतो. कारण आधी जंगल होते. पण आता याठिकाणी ठाण्याचा विकास झपाट्याने झाला आहे. आणि गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सगळे ठाण्यामध्ये येत आहेत. मुंबई सारखे ठाणे शहरही मेट्रो सिटी वाटत आहे. मला हा पुरस्कार दिला, त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो," असे जितेंद्र म्हणाले.
बदलापूर घटनेबाबत...
यासंदर्भात आमच्या आरोग्य विभागाच्या संचालकाला सूचना देण्यात आली आहे. वस्तुस्थितीप्रमाणे आपण यावरती कारवाई करू. यामध्ये पोलिसांनी जी कारवाई केलेली आहे, त्या अनुषंगाने आरोग्य विभागाकडून आम्ही तपास करू. निश्चितच अशा पद्धतीचे प्रकार खपून घेतले जाणार नाहीत. घटनेबाबत दोन ते तीन दिवसात याचा प्राथमिक अहवाल येईल. त्याच्यामध्ये अजूनही गांभीर्याने तपास करायची गरज असेल, तर त्या अनुषंगाने आपण निश्चित तपास केला जाईल. जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत, असे मंत्री आबिटकर यांनी स्पष्टपणे सांगितले.
ठाणे सिव्हिल रुग्णालयाबाबत...
आम्हाला ९ फेब्रुवारीला त्याचा शुभारंभ करायचा होता. परंतु यामध्ये काही प्रशासकीय मान्यता बाकी होती. प्रशासकीय मान्यता काही दिवसात पूर्ण होईल. तीन ते चार महिन्यात पूर्तता करून याचा निर्णय घेऊ. एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधायचे होते, पण हरकत नाही. महाराष्ट्रातील सर्वात मोठे ९०० बेडचे हे आरोग्य विभागाचे एकमेव रुग्णालय आहे. तांत्रिक बाबी लक्षात घेऊन येत्या तीन ते चार महिन्यात सिव्हिल रुग्णलयाचे लोकार्पण एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Web Summary : Veteran actor Jeetendra received a lifetime achievement award, praising Thane's rapid development. He noted increased travel time due to growth and investment. Minister Abitkar addressed the Badlapur incident, promising action and a report. He also announced the upcoming launch of Thane's 900-bed civil hospital.
Web Summary : दिग्गज अभिनेता जितेंद्र को जीवन गौरव पुरस्कार मिला, उन्होंने ठाणे के तेजी से विकास की सराहना की। उन्होंने विकास और निवेश के कारण यात्रा के समय में वृद्धि का उल्लेख किया। मंत्री आबिटकर ने बदलापुर घटना को संबोधित करते हुए कार्रवाई और रिपोर्ट का वादा किया। उन्होंने ठाणे के 900 बेड वाले सिविल अस्पताल के आगामी शुभारंभ की भी घोषणा की।