Join us

​‘वीरप्पन’ चित्रपट तुझ्या चेहऱ्याइतकाच सुंदर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2016 18:23 IST

‘वीरप्पन’ चित्रपटावर सध्या उलट सुलट चर्चा सुरू असून एका महिला पत्रकाराने चित्रपटाबाबत टीका केल्याने तिचे छायाचित्र ट्विटरद्वारे शेअर करून ...

‘वीरप्पन’ चित्रपटावर सध्या उलट सुलट चर्चा सुरू असून एका महिला पत्रकाराने चित्रपटाबाबत टीका केल्याने तिचे छायाचित्र ट्विटरद्वारे शेअर करून ‘हा चित्रपट तुज्या चेहऱ्याइतका सुंदर आहे’ अशा शब्दांत दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी त्या महिला पत्रकारावर उलट टीका केली आहे. राम गोपाल वर्मा यांचा ‘वीरप्पन’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला.चाहते व समीक्षकांकडून या चित्रपटावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मात्र एका महिला पत्रकाराला हा चित्रपट नापसंत पडल्याने तिने काही आशादायी समीक्षा पाहताना चित्रपटावर टीका केली. तिच्या टीकेमुळे राम गोपाल वर्मा अस्वस्थ झाले. त्यानंतर त्यांनी त्या महिला पत्रकाराचे छायाचित्र ट्विटरद्वारे शेअर केले आणि ‘तुज्या समीक्षेप्रमाणे ‘वीरप्पन’ चित्रपट तुज्या चेहऱ्याइतका सुंदर आहे’ अशा शब्दांत तिच्यावर टीका केली आहे.त्यानंतर राम गोपाल वर्मांवर टीका होत असताना त्यांनी पुन्हा केलेल्या कृत्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणार नसल्याचेही ट्विट केले आहे. मात्र काही वेळाने त्यांनी हे दोन्ही ट्विट हटविले.