Join us
Daily Top 2Weekly Top 5

​‘वीरे दी वेडिंग’ नाही तर ‘वीरे की वेडिंग’चा ट्रेलर आला! तुम्हीही पाहा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 11:32 IST

पुलकित सम्राट स्टारर ‘वीरे की वेडिंग’ या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला. आम्ही नावात चुकतोय, असा तुमचा समज होईल किंवा आम्ही करिना कपूर, सोनम कपूर, स्वरा भास्कर यांच्या नावांचा उल्लेख करायला विसरतोय, असेतुम्हाला वाटेल. पण नाही!

पुलकित सम्राट स्टारर ‘वीरे की वेडिंग’ या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला. आम्ही नावात चुकतोय, असा तुमचा समज होईल किंवा आम्ही करिना कपूर, सोनम कपूर, स्वरा भास्कर यांच्या नावांचा उल्लेख करायला विसरतोय, असेतुम्हाला वाटेल. पण नाही, आम्ही ‘वीरे की वेडिंग’ याच चित्रपटाबद्दलचं बोलतोय. पण त्याआधी तुमच्या मनातील गोंधळ दूर करायला हवा. होय, करिना, सोनम व स्वराच्या चित्रपटाचे नाव ‘वीरे दी वेडिंग’ आहे आणि पुलकित सम्राटच्या चित्रपटाचे नाव ‘वीरे की वेडिंग’असे आहे. नावात बरेच साधर्म्य असले तरी हे दोन्ही वेगवेगळे चित्रपट आहेत. ‘वीरे दी वेडिंग’ हा करिना व सोनमचा चित्रपट जूनमध्ये रिलीज होणार आहे.त्यामुळे तूर्तात आम्ही बोलतोय, ते ‘वीरे की वेडिंग’ या चित्रपटाबद्दल. याच चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला.या पुलकितने वीर अरोराची भूमिका साकारली आहे. पुलकितच्या अपोझिट दिसतेय ती कृती खरबंदा. ट्रेलरमध्ये पुलकित व कृतीचा रोमान्स दिसतोय. शिवाय त्याचा अ‍ॅक्शन अवतारही दिसतोय. जिमी शेरगील  पुलकितच्या मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. मुलींच्या मागे फार फिरायचे नाही. कारण वेळ आलीचं तर येथून परतणे कठीण होऊन बसते, असे तो  पुलकितला समजवण्याचा प्रयत्न करतोय. पण पुलकित बराच पुढे निघून गेलाय. पुलकित व कृती एकमेकांवर प्रेम करतात. पण दोघांच्याही कुटुंबात बरेच मतभेद आहेत , असे या ट्रेलरमध्ये दिसतेय. दमदार डायलॉग्स, अ‍ॅक्शन, पार्टी सॉन्ग्स असे सगळे या ट्रेलरमध्ये आहे. पुलकित व जिमीचे चाहते असाल तर हा ट्रेलर तुम्ही पाहायला हवा आणि तो कसा वाटला, हेही आम्हाला कळवायला हवे.