आयुषमानच्या भावासोबत वरुणचा ‘ब्रोमॅन्स’
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2016 17:00 IST
वरुण धवन त्यांच्या खेळकर स्वभावासाठी ओळखला जातो. आपल्या को-स्टार्ससोबत त्यांचे संबंध नेहमीच खेळीमेळीचे असतात.सेटवरील त्याची धमालमस्ती तो सोशल ...
आयुषमानच्या भावासोबत वरुणचा ‘ब्रोमॅन्स’
वरुण धवन त्यांच्या खेळकर स्वभावासाठी ओळखला जातो. आपल्या को-स्टार्ससोबत त्यांचे संबंध नेहमीच खेळीमेळीचे असतात.सेटवरील त्याची धमालमस्ती तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. नुकतेच वरूणने आयुषमान खुराणाचा भाऊ अपारशक्तीसोबत काढलेला फोटो ट्विट केला.अपारशक्ती आणि तो करण जोहरच्या बॅनरमध्ये तयार होणाऱ्या ‘बद्रीनाथ की दुल्हनियां’ चित्रपटात दोघे काम करत आहेत. वरूणने फोटोसोबत लिहिले की, टॅलेंटेड अपारशक्तीसोबत काम करताना खूप मजा येते आहे. आयुषमान, तुझा भाऊ आता आमचा आहे.या चित्रपटातून वरूण-आलियाची जोडी तिसऱ्यादा एकत्र दिसणार आहे. पुढील वर्षी 10 मार्च रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी दोघांनी ‘स्टुडंट आॅफ द इयर‘ आणि ‘हम्टी शर्र्मा की दुल्हनियां’ या चित्रपटांत काम केलेले आहे. }}}}