वरूण-परीने घेतली ‘चीची-लोलो’ची प्रेरणा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2016 15:42 IST
सध्या ‘ढिशूम’ चित्रपटातील नवीन गाणे ‘जानेमन आ’ याची प्रचंड चर्चा बॉलीवूडमध्ये सुरू आहे. या गाण्यात वरूण धवन आणि परिणीती ...
वरूण-परीने घेतली ‘चीची-लोलो’ची प्रेरणा!
सध्या ‘ढिशूम’ चित्रपटातील नवीन गाणे ‘जानेमन आ’ याची प्रचंड चर्चा बॉलीवूडमध्ये सुरू आहे. या गाण्यात वरूण धवन आणि परिणीती चोप्रा यांनी केलेल्या डान्समुव्हजवर जास्त चर्चा सुरू आहे. एकदम आगळावेगळा असा हा डान्स विशेष चर्चेचा मुद्दा बनला आहे.वेल, तुम्हाला सांगण्यास काही हरकत नाही की, या गाण्यातील डान्ससाठी वरूण-परीने ‘चीची-लोलो’ म्हणजेच गोविंदा-करिष्माची प्रेरणा घेतली आहे.वरूण याविषयी बोलताना म्हणाला की,‘ रोहितला मसाला नंबर पाहिजे होता आणि त्याला गोविंदा-करिष्माचा डान्सिंग जलवा पुन्हा अनुभवायचा होता. म्हणून आम्ही त्याप्रकारे डान्स रिहर्सल सुरू केली. ’ वरूण-परिणीती हे दोघे एकमेकांसोबत अतिशय हॉट आणि परफेक्ट जोडी दिसत आहेत.