वरुण करणार वडिलांसोबत काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 06:12 IST
अ भिनेता वरूण धवन हा लवकरच त्याचे वडील दिग्दर्शक डेव्हीड धवनसोबत काम करतांना दिसणार आहे. वरूण म्हणाला,' ...
वरुण करणार वडिलांसोबत काम
अ भिनेता वरूण धवन हा लवकरच त्याचे वडील दिग्दर्शक डेव्हीड धवनसोबत काम करतांना दिसणार आहे. वरूण म्हणाला,' आमच्या मनात होतेच असे काही. पण ज्यांना मला माझ्या वडिलांसोबत काम करतांना पाहायचंय त्यांची इच्छा लवकरच पूर्ण होईल. स्क्रिप्ट वर काम करणे सध्या सुरू आहे. ' डेव्हिड धवन यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट 'मैं तेरा हिरो' मध्ये वरूणने महत्त्वाची भूमिका साकारली होती. यात त्याच्यासोबत इलियाना डिक्रुझ, नर्गिस फाखरी या अभिनेत्री होत्या. दरम्यान, वरूण धवन त्याच्या आगामी चित्रपट 'दिलवाले' तील 'मनमा इमोशन जागे रे' हे गाणे पसंतीस उतरत आहे. त्यामुळे तो सध्या अत्यंत खुश आहे. प्रेक्षकांतुन त्याला सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत. पण प्रेक्षकांना आवडतेय यातच मला आनंद वाटतोय, असे तो म्हणतो.