Join us

​वरूण झाला भावूक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2016 21:16 IST

‘ढिशूम’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी फिरत असलेला वरूण धवन आज काहीसा इमोशनल झाला. इंस्तबुल आणि ढाका याठिकाणी झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील मृतांना ...

‘ढिशूम’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी फिरत असलेला वरूण धवन आज काहीसा इमोशनल झाला. इंस्तबुल आणि ढाका याठिकाणी झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील मृतांना त्याने श्रद्धांजली वाहिली. माझ्या मनात आणि मेंदूत यावेळी काहीतरी सुरु आहे. तुम्ही ते समजू शकता. गेल्या काही दिवसात जगभरात अनेक ठिकाणी अतिरेकी हल्ले झालेत. इंस्तबुल असो वा ढाका..या अतिरेकी हल्ल्यात अनेकांनी आपले प्रियजन गमावले आहेत. मी त्या मृताम्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रति सांत्वना व्यक्त करतो, असे वरूण म्हणाला. वरूण व जॉनचा ‘ढिशूम’ लवकरच प्रदर्शित होत आहे. येत्या २९ जुलैला हा चित्रपट पे्रक्षकांच्या भेटीस येतो आहे.