तर या ताऱेखाला रिलीज होणार वरूण धवनचा 'अक्टूबर'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2018 13:44 IST
गतवर्षी आलेल्या वरूण धवनच्या जुडवा2 चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमावला होता. यानंतर वरूण धवनच्या झोळीत सुई धागा आणि अक्टूबरसारखे दोन चित्रपटात आले.
तर या ताऱेखाला रिलीज होणार वरूण धवनचा 'अक्टूबर'
गतवर्षी आलेल्या वरूण धवनच्या जुडवा2 चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमावला होता. यानंतर वरूण धवनच्या झोळीत सुई धागा आणि अक्टूबरसारखे दोन चित्रपटात आले. नुकतीच वरूणने आपला आगामी चित्रपट अक्टूबरचे शूटिंग पूर्ण केले आहे. वरूण धवनच्या फॅन्ससाठी आमच्या एक खूशखबर आहे. थोड्यावेळा पूर्वी वरूणने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात एक कॅलेंडर दिसते आहे. या कॅलेंडरमध्ये जानेवार, फेब्रुवारी, मार्चनंतर सरळ ऑक्टोबर महिना दिसतो आहे. कॅलेंडरच्या प्रत्येक महिन्यावर वरूण आणि बनिताचे चित्रपटातील काही फोटोज आहेत. या व्हिडीओ शेअर करताना वरूणने यासोबत एक कॅप्शनसुद्धा दिले आहे. यावर्षी एप्रिल महिन्यानंतर ऑक्टोबर महिना येणार आहे. याचबरोबर वरूणने चित्रपटाची रिलीज डेट देखील जाहिर केली आहे. 13 एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अक्टूबर’ या चित्रपटात वरूण धवनसोबत दिसणारी बनिता संधू हा नवा चेहरा दिसणार आहे. एनआरआय असलेली बनिता लंडनमध्ये राहते. पंजाबी कुटुंबात जन्मलेली बनिता ११ वर्षांपासून अभिनय करतेय. ‘डबलमिंट’च्या ‘एक अजनबी हसीना से’ या गाण्यात ती दिसली होती. यू ट्यूबवरील हे गाणे तब्बल ६० लाख लोकांनी पाहिले होते. यानंतर बनिताने मागे वळून पाहिलेच नाही.‘अक्टूबर’ या चित्रपटात एक वेगळी आणि हटके कथा आपल्याला पाहायला मिळणार आहे. शुजीत यांना वृत्तपत्रातील एका बातमीवरून या चित्रपटाची कथा सुचली होती. शुजीत सरकार ‘पीकू’ या चित्रपटावर काम करीत असताना अचानक वृत्तपत्रातील एका बातमीने त्यांचे लक्ष वेधले होते. याच बातमीने शुजीत यांना त्यांच्या ‘अक्टूबर’ या चित्रपटासाठी एक आगळीवेगळी कथा दिली. शुजीत यांच्या मते, हा एक स्लाइस आॅफ लाइफ चित्रपट असेल. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा चित्रपट म्हणजे एक नवा एक्सपीरियन्स असेल. यानंतर वरूण अनुष्का शर्मासोबत स्क्रिनवर रोमांस करताना दिसणार आहे. सुई धागा या चित्रपटात वरुणच्या अपोझिट अनुष्का दिसणार आहे.