Join us

​‘जुडवा2’मध्ये वरूण धवनचा डबल धमाका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2017 12:08 IST

वरूण धवन याच्या बहुप्रतिक्षीत ‘जुडवा2’ या चित्रपटाचे नवे पोस्टर आज रिलीज झाले.  येत्या २१ तारखेला ‘जुडवा2’चा ट्रेलर आपल्या भेटीस ...

वरूण धवन याच्या बहुप्रतिक्षीत ‘जुडवा2’ या चित्रपटाचे नवे पोस्टर आज रिलीज झाले.  येत्या २१ तारखेला ‘जुडवा2’चा ट्रेलर आपल्या भेटीस येणार आहे. त्यापूर्वी तुमची उत्कंठा शिगेला पोहोचवणारे या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहे.  या चित्रपटात वरूण धवनचा डबल अंदाज आपल्याला बघायला मिळणार, हे तुम्हाला ठाऊक आहेच. या नव्या पोस्टरमध्येही वरूण दोन रूपात दिसतोय. एकात त्याचे केस वाढलेले आहेत. तर दुसºयात तो एकदम जेंटलमॅन स्टाईलमध्ये दिसतोय.या पोस्टरमधील केस वाढलेल्या वरूणला पाहून तुम्हाला आधीचा वरूण आठवल्याशिवाय राहणार नाही. ‘स्टुडंट आॅफ द इअर’ रिलीज होण्यापूर्वी वरूणचे केस असेच लांब होते.ALSO READ : ​वरूण धवनला मिळाली ‘दुल्हनिया’; या महिन्यात होणार साखरपुडा!१९९७ साली दिग्दर्शक डेव्हिड धवन यांच्या सुपरहिट चित्रपटात सलमान खानने दुहेरी भूमिका केली होती. तब्बल १९ वर्षांनंतर याच चित्रपटाचा सीक्वल पुन्हा तयार करण्यात येत  आहे. विशेष म्हणजे, या सीक्चलमध्येही तुम्हा-आम्हाला सलमान खान  पाहायला मिळणार आहे. अर्थात केवळ दोन मिनिटांसाठी. होय, सलमान यात कॅमिओ करताना दिसणार आहे. सलमान चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये दिसणार आहे, तेही ठीक क्रेडिटच्या आधी. वरूण धवनचे डबल कॅरेक्टर राजा आणि प्रेम एका हॉटेलमध्ये रिअल राजा व प्रेम म्हणजेच सलमानला एका हॉटेलात भेटतात, असा हा सीन असेल. यात सलमान व वरूणचा एखाद-दुसरा संवाद आहे.  ‘उंची है बिल्डिंग’ आणि ‘टन टना टन...’ही दोन गाजलेली गाणीही ‘जुडवा2’मध्ये दिसणार असल्याचे कळतेय. जॅकलिन फर्नांडिस व तापसी पन्नूही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. येत्या वर्षात दसºयाच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.