Join us
Daily Top 2Weekly Top 5

वरुण धवनने शेअर केला सिक्स पॅक अ‍ॅब्स दिसत असलेला फोटो; तापसी पन्नूने लिहिले, ‘जरा खात-पित जा’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2018 16:18 IST

अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री तापसी पन्नू या जोडीला ‘जुडवा-२’मध्ये प्रेक्षकांकडून चांगलेच पसंत केले गेले. त्यामुळेच या चित्रपटाने बॉक्स ...

अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री तापसी पन्नू या जोडीला ‘जुडवा-२’मध्ये प्रेक्षकांकडून चांगलेच पसंत केले गेले. त्यामुळेच या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई केली. त्यांचा हा चित्रपट गेल्यावर्षी रिलीज झाला होता, परंतु वरुण आणि तापसीमधील ट्यूनिंग पाहता हे दोघे अजूनही चित्रपटाच्या आठवणी विसरले नसावेत असेच काहीसे दिसत आहे. कारण सोशल मीडियावर ज्या पद्धतीने हे दोघे एकमेकांच्या पोस्टला प्रतिसाद देतात त्यावरून त्यांच्यातील मैत्री स्पष्टपणे दिसून येते. त्याचे झाले असे की, वरुणने त्याच्या आॅफिशियल ट्विटर पेजवर एक सिक्स पॅक अ‍ॅब्स दाखविणारा त्याचा एक फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करताच चाहत्यांनी त्यास प्रचंड पसंत केले जात आहे. विशेष म्हणजे वरुणचा हा अंदाज तापसीलाही भावला, म्हणून तिने त्यास कॉमेण्ट दिली. मात्र ही कॉमेण्ट काहीशी खोचक असल्याने, तापसी आणि वरुणमधील केमिस्ट्री अजूनही कायम असल्याचे दिसून आले. तापसीने तिच्या कॉमेण्टमध्ये लिहिले की, ‘प्लीज जेवण करत जा, नाहीतर मी लाली आण्टीला कॉल करणार’ तापसीच्या या ट्विटला रिप्लाय देताना वरुणने लिहिले की, ‘हो हो तू पराठा खाल्ला, पण मला बोलाविले नाही’वरुणच्या या कॉमेण्टनंतर तापसीने पुन्हा रिप्लाय देताना लिहिले की, ‘तू नवे घर खरेदी केले, मात्र हाउस वार्मिंगला नाही बोलाविले अन् पराठा मला मागतोस? घोर कलियुग.’ तापसी आगामी ‘दिल जंगली हैं’ या चित्रपटात बघावयास मिळणार आहे. या चित्रपटाची दोन गाणीही रिलीज झाली असून, त्यात तापसी जबरदस्त अंदाजात दिसत आहे. या चित्रपटाला अलिया सेन दिग्दर्शित करीत आहेत, तर चित्रपटाची निर्मिती पूजा इंटरटेनमेंट बॅनर अंतर्गत केली जात आहे. ‘दिल जंगली’चे निर्माते जॅकी भगनानी आणि दीपशिखा देशमुख आहेत. तिचा हा चित्रपट १६ फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे.