Join us

वरुण धवन गर्लफ्रेंड नाताशासोबत करतोय व्हेकेशन एन्जॉय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 11:22 IST

वरूण धवन सध्या आपला आगामी सिनेमा 'कलंक' घेऊन चर्चेत आहे. आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून वरुण गर्लफ्रेंड नाताशासोबत लंडनमध्ये व्हेकेशन एन्जॉय करतोय. 

ठळक मुद्देवरूनने नुकतेच शरत कटारियाच्या 'सुई धागा'ची शूटिंग पूर्ण केली आहेवरुण सध्या नाताशासोबत लंडनमध्ये हॉलिडे

वरूण धवन सध्या आपला आगामी सिनेमा 'कलंक' घेऊन चर्चेत आहे. आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून वरुण गर्लफ्रेंड नाताशासोबत लंडनमध्ये व्हेकेशन एन्जॉय करतोय.  ऐवढेच नाही तर  हम्टी शर्मा की दुल्हनिया आणि ब्रदीनाथ की दुल्हनियाचे दिग्दर्शक शशांक खेतान सध्या व्हेकेशनवर आहे. सोशल मीडियावर यांच्या व्हेकेशनचे फोटो व्हायरल झाले आहेत.   

 

वरूनने नुकतेच शरत कटारियाच्या 'सुई धागा'ची शूटिंग पूर्ण केली आहे. नव्या सिनेमाची शूटिंग सुरु करण्यापूर्वी वरुन आपल्या गर्लफ्रेंडसोबत कॉलिटी टाईम स्पेंट करतोय. वरुण आणि नाताशाच्या लग्नाची ही सध्या जोरदार चर्चा आहे. अद्याप दोघांनीही नातं कधी स्वीकारले नाही. मात्र अनेकवेळा दोघांना एकत्र सार्वजनिक ठिकाणी पाहण्यात आलेले आहे.     

वरुणच्या प्रोफेशनल लाईफबाबत बोलायचे झाले तर तो 'कलंक'मध्ये तो आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर , सोनाक्षी सिन्हा, कुणाल खेमू, संजय दत्त आणि माधुरी दीक्षितबरोबर दिसणार आहे. अभिषेक वर्मन या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून सिनेमात 1940 च्या दशकातील कहाणी दाखविली जाणार आहे.‘कलंक’या सिनेमाची कल्पना 15 वर्षाआधी सुचली होती. या सिनेमाचं प्री-प्रोडक्शन माझ्या वडिलांनी सुरू केलं होतं. आता हा सिनेमा अभिषेक वर्मनकडे देताना मला खूप आनंद होतो आहे, असं करण जोहरने ट्विट करत म्हटलं होतं. 'कलंक'चा सेट चित्रकुट मैदानावर साकारण्यात आला होता. येथेच शूटींग सुरु होते. पण काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे या सेटचे नुकसान झाले. या सेटवर २० दिवस शूटींग होणार होते. पण आता हे शूटींग रद्द करण्यात आले आहे. आता पुन्हा नव्याने सेट बनल्यानंतर शूटींग सुरू होऊ शकेल.       

टॅग्स :वरूण धवन