‘डब्बा गुल’ मध्ये वरूण-बिग बी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2016 16:25 IST
दिग्दर्शक प्रदीप सरकार हे ‘मर्दानी’ चा सिक्वेल काढणार असल्याची चर्चा मध्यंतरी चांगलीच गाजली होती. यात राणी मुखर्जीने पोलिस अधिकाºयाची ...
‘डब्बा गुल’ मध्ये वरूण-बिग बी?
दिग्दर्शक प्रदीप सरकार हे ‘मर्दानी’ चा सिक्वेल काढणार असल्याची चर्चा मध्यंतरी चांगलीच गाजली होती. यात राणी मुखर्जीने पोलिस अधिकाºयाची भूमिका केली आहे. उत्तम अभिनय, प्रभुत्व, छाप यासर्वच बाबतीत तिने स्वत:मधील जाणकार कलाकाराचे दर्शन घडवले आहे.मात्र आता सरकार यांनी नवा प्रोजेक्ट ‘डब्बा गुल’चे काम हाती घेण्याचे ठरवले आहे. यात बॉलीवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन आणि वरूण धवन यांना घेण्याचा ते विचार करत आहेत.बच्चन यांनी याअगोदर वरूणचे वडील डेव्हीड धवन यांच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’,‘ हम किसीसे कम नहीं’ मध्ये काम केलेले आहे. तर आता पाहूयात की बिग बी आणि वरूण यांची जोडी कशी जमतेय ती!