Join us  

'हम आपके है कौनच्या रिमेकमध्ये वरुण आणि आलिया असावेत'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2018 9:51 AM

सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांची हिट केमिस्ट्री असलेल्या चित्रपटाचे नाव सगळ्यांच माहिती आहे. तो चित्रपटात म्हणजे हम आपके ...

सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांची हिट केमिस्ट्री असलेल्या चित्रपटाचे नाव सगळ्यांच माहिती आहे. तो चित्रपटात म्हणजे हम आपके है कौन ज्यांने इतिहास रचला. तब्बल 23 वर्षांनी या चित्रपटात भूमिका साकारणारी रेणुका शहाणेने चित्रपटातील आठवणींना उजाळा दिला. या चित्रपटात रेणुका शहाणेने माधुरीतच्या बहिणीची भूमिका साकारली होती.  मीडियाने रेणुकाला यावेळी प्रश्न विचारला जर 'हम आपके है कौन'चा रिमेक तयार करण्यात आला तर त्यात प्रेम आणि निशाच्या भूमिकेत तिला कोणाला बघायला आवडेल ? यावर रेणुकाने पटकन उत्तर दिले आलिया भट्ट आणि वरुण धवनला. जर हा चित्रपट यंग जनरेशनला डोक्यात ठेवून बनवण्यात येतो आहे तर यातील कलाकारांना मॉर्डन अंदाजात बघणे पसंत करेल.  सध्या तरी आलिया भट्ट तिचा आगामी चित्रपट 'ब्रह्मास्त्र'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात  रणबीर आणि आलियासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटात रणबीर आलियाशिवाय बिग बी अमिताभ बच्चनसुद्धा दिसणार आहेत. पहिल्यांदाच रणबीर आणि आलिया एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. हा चित्रपट तीन भागांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. याचा पहिला भाग  १५ ऑगस्ट २०१९ ला रिलीज केला जाणार आहे. या चित्रपटासाठी रणबीरने घोडेस्वारी आणि जिम्नॅस्टिकची ट्रेनिंगसुद्धा घेतले  आहे. या चित्रपटाचे नाव आधी 'ड्रॅगन' असे ठरवण्यात आले होते. अयान मुखर्जी अनेक दिवसांपासून या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत होता. ज्यात एक सुपरहिरो आहे आणि त्याच्याकडे अद्नभुत शक्ति आहेत. या कथेला अनुसरून करण जोहरने या चित्रपटाचे नाव 'ब्रह्मास्त्र' असे ठेवले आहे. करण जोहर या चित्रपटाची निर्मिती करतो आहे. ALSO READ :  Grandma Day: आजीसोबत आलिया भट्टने असा घालवला वेळ! फोटो होतोय व्हायरल!!तर वरुण धवन लवकरच त्याचा आगामी चित्रपट सुई धागाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शरत कटारिया करणार आहे. तर मनीष शर्मा या चित्रपटाचे प्रोड्यूसर आहेत. ‘मेड इन इंडिया’च्या आयडॉलॉजीवर आधारित या चित्रपटात एक नवी कथा आपल्याला पाहायला मिळणार आहे.