Join us

​व्हॅलेन्टाईन वीकमध्ये ‘या’ मुलीच्या प्रेमात पडलायं सोशल मीडिया! जाणून घ्या कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2018 10:24 IST

एक व्हिडिओ व्हॅलेन्टाईन वीकपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओने इंटरनेटवर जणू आग लावली आहे.

मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर अचानक चर्चेत आली आहे.   प्रियाचा एक व्हिडिओ व्हॅलेन्टाईन वीकपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओने इंटरनेटवर जणू आग लावली आहे. होय, या व्हिडिओत प्रिया प्रकाश ‘आंखों ही आंखों में’ रोमान्स करताना दिसतेय. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या शाळेच्या दिवसांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. डोळ्यांनी डोळ्यांना प्रेम शिकवणारा हा व्हिडिओ प्रियाचा आगामी चित्रपट ‘ओरू अडार लव’ यातील ‘मानिका मलयारा पूवी’ या गाण्याचा आहे. हे गाणे शान रहमान यांनी कंपोज केले आहे. व्हॅलेन्टाईन वीकमध्ये प्रेमाचे प्रतिक म्हणून हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.त्यामुळे काही तासांतच हा व्हिडिओ टॉप ट्रेंडिंगमध्ये आलायं. या व्हिडिओला एडिट करून अनेक रोमॅन्टिक व्हिडिओही बनवले जात आहे.‘मानिका मलयारा पूवी’ हे गाणे आत्तापर्यंत यु-ट्यूबवर  चार कोटींवर लोकांनी बघितले आहे. तुम्हीही बघा आणि प्रियाचा यातील अंदाज तुम्हाला कसा वाटला, ते आम्हाला नक्की कळवा.प्रिया प्रकाश वारियर ‘ओरू अडार लव’ या चित्रपटाद्वारे अ‍ॅक्टिंग डेब्यू करतेय. येत्या ३ मार्चला हा चित्रपट रिलीज होतो आहे. पण त्याआधीच प्रिया चर्चेत आली आहे. प्रियाच्या सौंदर्याचीही चर्चा होऊ लागली आहे. प्रिया ही केरळच्या त्रिशूरची राहणारी आहे.  डान्स हा तिचा जीव की प्राण. याशिवाय भटकंती हाही तिचा आवडता विषय. बी कॉम फर्स्ट ईअरची विद्यार्थीनी असलेली प्रिया सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे.‘ओरू अडार लव’ या आपल्या पहिल्या चित्रपटात प्रिया एका किशोरवयीन मुलीच्या भूमिकेत आहे. किशोरवयात मनात फुलू लागलेल्या प्रेमाची कथा यात आहे.