Join us
Daily Top 2Weekly Top 5

Valentine's Day Special: प्रिती झिंटा पती जीनला कशी भेटली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2017 17:07 IST

बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाने जेंव्हा जीन गुडेनगॉफशी लग्न केले, त्यावेळी अनेकांना आश्चर्य वाटले. हे दोघे एकमेकांना कसे भेटले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय कसा घेतला? याबाबत प्रिती झिंटाने आज फेसबुक चॅटवर यासंदर्भात माहिती दिली.

बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाने जेंव्हा जीन गुडेनगॉफशी लग्न केले, त्यावेळी अनेकांना आश्चर्य वाटले. हे दोघे एकमेकांना कसे भेटले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय कसा घेतला? याबाबत प्रिती झिंटाने आज फेसबुक चॅटवर यासंदर्भात माहिती दिली. फॅन्सच्या प्रश्नांना उत्तरे देताना तिने दिलखुलासपणे या बाबी शेअर केल्या.तू तुझ्या पतीला कशी भेटलीस याविषयी बोलताना प्रिती म्हणाली, सहा वर्षापूर्वी लॉस एंजल्समधील सँटा मोनिका येथे भेटले. जीन हा फायनान्शिअल अ‍ॅनालिस्ट आहे. आम्ही पाच वर्षे डेटवर होतो. गेल्या फेब्रुवारी महिन्यात आम्ही लग्न केले’. याशिवाय तिने सांगितले की, ‘मी खºया प्रेमावर विश्वास ठेवते. परंतु काळानुसार  जोडपे पुढे जाते. एकमेकांचा आदर करीतच हे प्रेम पुढे जाते.’Also read जेनेसोबत प्रिती विवाहबद्ध !गेल्या वर्षी २९ फेब्रुवारीला हे जोडपे विवाहबद्ध झाले. त्यानंतर या जोडप्यांचा हा पहिला व्हॅलेंटाईन डे आहे. प्रितीने आपल्या रोमान्सविषयी आपण फार काही सांगणार नाही, परंतु सहा वर्षापूर्वी भेटलो आणि आम्ही एकमेकांना पाच वर्षे डेट केले असे सांगितले.आपल्या पतीने लग्नानंतरही चित्रपटात काम करण्याविषयी नेहमीच प्रोत्साहन दिल्याचे यापूर्वी प्रितीने सांगितले होते.