Join us

युवी-हेजलच्या लग्नाचे प्लॅन्स रिव्हील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2016 10:23 IST

आपल्याला तर माहितीच आहे की, युवराज सिंग आणि अभिनेत्री हेजल किंच या दोघांची एन्गेजमेंट झाली असून ते लवकरच आता ...

आपल्याला तर माहितीच आहे की, युवराज सिंग आणि अभिनेत्री हेजल किंच या दोघांची एन्गेजमेंट झाली असून ते लवकरच आता लग्न करणार आहेत. अद्याप लग्नाची तारीख निश्चित झाली नाही तरीही ते दोघे हिंदू आणि शीख पद्धतीने लग्न करणार आहेत.युवी म्हणाला, अंगद बेदी हा माझा बेस्ट मॅन असणार आहे, तर हेजलने तिची बहीण टिना कीच हेंडरसन, ब्रुना अब्दुल्ला, इन्सिया लेसवाला यांना तिचे बेस्ट गर्ल्स सांगितल्या आहेत. तसेच तिने लग्नानंतर तिचा हनीमुन ‘हवाई’ येथे साजरा करण्याचे ठरवले आहे.तर युवीला केवळ सुंदरशा बीच असलेल्या ठिकाणी जावेसे वाटत आहे. जसे की बोरा बोरा आणि मालदीव्ह्ज सारख्या ठिकाणी.’