Join us
Daily Top 2Weekly Top 5

 ‘इंडियाज् नेक्स्ट टॉप मॉडल’च्या फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ, पाहताच होईल कलेजा खल्लास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 08:00 IST

‘इंडियाज् नेक्स्ट टॉप मॉडल 4’ हा एमटीव्हीवरचा रिअ‍ॅलिटी शो आठवत असेल तर यातला हा चेहराही तुम्हाला हमखास आठवत असेल.

ठळक मुद्देसुरुवातीला कुुटुंबाने तिला विरोध केला. मॉडेलिंगमध्ये प्रत्येक प्रकारचे कपडे घालावे लागतात. उर्वीच्या कुटुंबाचा याला विरोध होता.

‘इंडियाज् नेक्स्ट टॉप मॉडल 4’ हा एमटीव्हीवरचा रिअ‍ॅलिटी शो आठवत असेल तर यातला एक चेहराही तुम्हाला हमखास आठवत असेल. हा चेहरा म्हणजे, उर्वी शेट्टी हिचा. ‘इंडियाज् नेक्स्ट टॉप मॉडल 4’चे विजेतेपद मिळवत मुंबईची उर्वी चर्चेत आली होती. सध्या ती पुन्हा एकदा चर्चेत आहे. का तर तिच्या बोल्ड फोटोंमुळे.उर्वी मॉडेलिंगच्या दुनियेतील एक मोठे नाव आहे. नवनव्या फोटोशूटमध्ये ती बिझी असते आणि या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. तिचे हे फोटो पाहून चाहते अक्षरश: वेडे होतात.

‘इंडियाज् नेक्स्ट टॉप मॉडल 4’ हा शो मलायका अरोराने जज केला. या शोच्या बिकिनी राऊंडमध्ये उर्वीने काही चुका केल्या होत्या. तिला आजही या चुकांचा पश्चाताप आहे. पण शोदरम्यान मलायकाने दिलेल्या टीप्स उर्वीने स्मरणात ठेवल्या. कदाचित याचमुळे उर्वीने करिअरमध्ये मोठा पल्ला गाठला आहे.

‘इंडियाज् नेक्स्ट टॉप मॉडल 4’ या शोदरम्यान उर्वीने स्वत:त अनेक सुधारणा घडवल्या. तिची हीच गोष्ट मलायकाला भावली होती.

‘इंडियाज् नेक्स्ट टॉप मॉडल 4’ जिंकल्यानंतर उर्वीला वायकॉम 18 व एक्सीड एंटरटेनमेंटचा एक वर्षांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता.

मॉडेलिंगच्या क्षेत्रात उर्वीने प्रचंड मेहनत केली. तिचे कुटुंब पारंपरिक विचारांचे होते. त्यामुळे उर्वीने मॉडेलिंग हे क्षेत्र निवडले असता, नातेवाईकांकडून तिला ब-याच गोष्टी ऐकाव्या लागल्या.

सुरुवातीला कुुटुंबानेही तिला विरोध केला. मॉडेलिंगमध्ये प्रत्येक प्रकारचे कपडे घालावे लागतात. उर्वीच्या कुटुंबाचा याला विरोध होता.

अशास्थितीत तिची बहीण तिच्या पाठीशी उभी राहली. तिने घरच्यांना समजावले.  उर्वीलाही स्वत:वर विश्वास होता. याच विश्वासाच्या जोरावर तिने आई-वडिलांना एका वर्षांचा वेळ मागितला आणि या वर्षभरात स्वत:ला सिद्ध केले.

टॅग्स :मलायका अरोरा